“मी Gen Z वर आंधळा विश्वास ठेवतो…” सरसंघचालकांचे मोठे विधान
“मी Gen Z वर आंधळा विश्वास ठेवतो…” सरसंघचालकांचे मोठे विधान
मुंबई-: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी ६ ऑगस्ट २०२६ रोजी मुंबईतील ‘नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर’ (एनएमएसीसी) येथे ‘इंडियाज इंटरनॅशनल मूव्हमेंट टू युनायटेड नेशन्स’ (I.I.M.U.N.) च्या कार्यक्रमात २ हजारहून अधिक ‘जेन-झी’ (Gen-Z) आणि ‘जेन-अल्फा’ विद्यार्थ्यांशी संवाद साधला. “मी आजच्या Gen-Z पिढीवर आंधळा विश्वास ठेवतो,” असे स्पष्ट करत त्यांनी सांगितले की, चांगल्या शिक्षण व्यवस्थेसाठी आणि देशातील सुधारांसाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा विद्यार्थ्यांना पूर्ण लोकशाही अधिकार आहे. त्यांनी स्पष्ट केले की, लोकशाहीत संवाद साधण्याचे आंदोलन हे एक महत्त्वाचे माध्यम आहे. तरुण जर आपल्या मागण्यांसाठी आवाज उठवत असतील तर ते विरोधासाठी नाही, तर व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी आहे, हे समजून घेतले पाहिजे.
आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना किंवा तरुणांना लगेच राष्ट्रविरोधी ठरवण्याच्या प्रवृत्तीवर भागवत यांनी कडक शब्दांत आक्षेप घेतला:
संवादाची गरज: केवळ रस्त्यावर उतरल्याने किंवा प्रश्न विचारल्याने कोणी राष्ट्रविरोधी होत नाही. आजची पिढी अत्यंत प्रामाणिक असून त्यांचे ऐकून घेणे गरजेचे आहे.
तर्कनिष्ठ प्रश्न: जुनी पिढी वरिष्ठांना प्रश्न विचारत नव्हती, मात्र आजची जेन-झी आणि जेन-अल्फा पिढी प्रेमाने आणि तर्काने प्रश्न विचारते.
शिक्षणाचे व्यापारीकरण: शिक्षण हा कोणताही व्यवसाय नाही. शिक्षणासाठी ६ टक्के बजेटची मागणी जुनीच आहे, मात्र केवळ सरकारनेच नाही तर समाजानेही शिक्षणाची जबाबदारी घेतली पाहिजे.
LGBTQ समुदायावर बोलताना मोहन भागवत यांनी सांगितले की, हा समाज आपल्याच देशाचा एक महत्त्वाचा भाग आहे आणि त्यांना सामावून घेण्याची आपली जुनी परंपरा आहे. मात्र, त्यांनी विवाह आणि एकत्र राहणे (कंपॅनियनशिप) यातील फरक स्पष्ट केला. विवाह ही केवळ दोन व्यक्ती एकत्र राहण्याची सोय नसून ती समाजाची एक मूलभूत संस्था आहे. त्यामुळे समलैंगिक विवाहाला पाठिंबा न देता, अशा जोडप्यांच्या एकत्र राहण्यासाठी (कंपॅनियनशिप) समाजाने योग्य ती रचना किंवा व्यवस्था निर्माण केली पाहिजे, असे मत त्यांनी मांडले.
देशावरील संकटाच्या काळात नागरिकांनी सरकारच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे, असे सांगताना त्यांनी पाकिस्तान आणि चीनचे उदाहरण दिले. कायमचा द्वेष हा कोणत्याही समस्येचा उपाय असू शकत नाही, असे सांगत सर्व पाकिस्तानी आपले शत्रू नाहीत आणि मानवता हीच सर्वात मोठी गोष्ट असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 9 JULY TO...
- 09 July, 2026
ADHARSH SWARAJ 2 JULY TO...
- 02 July, 2026
ADHARSH SWARAJ 25 JUNE...
- 25 June, 2026
ADHARSH SWARAJ 18 JUNE...
- 18 June, 2026
ADHARSH SWARAJ 4 JUNE TO...
- 04 June, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Mukesh S. Dhawade