Claud AI कडून 3 कंपन्यांच्या सिस्टम हॅक
Claud AI कडून 3 कंपन्यांच्या सिस्टम हॅक
मुंबई-: Claud AI ने टेस्टिंगरम्यान 3 कंपन्यांच्या सिस्टीम हॅक केल्या. कंपनीने सांगितले की, एका सिस्टीमच्या चुकीच्या कॉन्फिगरेशनमुळे मॉडेलला चुकून इंटरनेटचा ॲक्सेस मिळाला, ज्यामुळे त्याने खऱ्या कंपन्यांच्या डिजिटल पायाभूत सुविधांमध्ये घुसखोरी केली. अमेरिकन टेक फर्म ॲन्थ्रोपिकने सांगितले की, सायबर सुरक्षा चाचणीदरम्यान त्याच्या Claud AI मॉडेलने तीन वेगवेगळ्या संस्थांच्या सिस्टीममध्ये अनधिकृतपणे प्रवेश केला. कंपनीने सांगितले की, ही घटना सिस्टीमच्या चुकीच्या कॉन्फिगरेशनमुळे घडली, ज्यामुळे चाचणीसाठी निश्चित केलेल्या सुरक्षित मर्यादा मोडल्या गेल्या आणि मॉडेलला थेट इंटरनेटचा ॲक्सेस मिळाला.
प्रतिस्पर्धी कंपनी Open AI त्यांच्या मॉडेल्सद्वारे इतर कंपन्यांच्या सिस्टीममध्ये घुसखोरी केल्याचा अहवाल जारी केल्यानंतर ॲन्थ्रोपिकने त्यांच्या सिस्टीमची तपासणी सुरू केली होती. ॲन्थ्रोपिकने सुमारे 1.40 लाखांहून अधिक चाचण्यांच्या नोंदींचे पुनरावलोकन केले. या दरम्यान कंपनीला तीन अशा प्रकरणांची माहिती मिळाली जिथे Claud ने सुरक्षित चाचणी वातावरणातून बाहेर पडून सिस्टीम्स हॅक केल्या होत्या.
सुरक्षा आणि गोपनीयतेच्या कारणांमुळे एंथ्रोपिकने त्या तिन्ही प्रभावित संस्थांची नावे उघड केली नाहीत. विशेष म्हणजे, घटनेच्या वेळी एंथ्रोपिकला किंवा त्या तिन्ही संस्थांना या घुसखोरीची माहिती नव्हती. नंतर तपासणीदरम्यान हे प्रकरण समोर आले, त्यानंतर एंथ्रोपिकने प्रभावित कंपन्यांना याची माहिती दिली. या घटना एप्रिलपासून सुरू झाल्या होत्या.
सायबर सुरक्षा तज्ज्ञ डेव्हिड अलॉट यांनी BBC ला सांगितले की, या घटनेतून मिळालेला मोठा धडा हा नाही की एआयने कोणतीही नवीन हल्ल्याची क्षमता प्राप्त केली आहे. तर खरी चिंता ही आहे की एआय एजंट्स स्वायत्तपणे विविध क्षमता एकत्र करून, क्रेडेन्शियल्स आणि सिस्टम ॲक्सेस मिळवू शकतात आणि मशीनच्या गतीने त्यांच्या कामाची व्याप्ती वाढवू शकतात.
या सायबर सुरक्षा घटनांनंतर कठोर नियम आणि देखरेखीची मागणी तीव्र झाली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले की, अलीकडील सायबर सुरक्षा घटना लक्षात घेता, एआय टूल्स आणि त्यांच्या वापराला आळा घालण्यासाठी कठोर उपायांवर विचार करत आहेत.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 9 JULY TO...
- 09 July, 2026
ADHARSH SWARAJ 2 JULY TO...
- 02 July, 2026
ADHARSH SWARAJ 25 JUNE...
- 25 June, 2026
ADHARSH SWARAJ 18 JUNE...
- 18 June, 2026
ADHARSH SWARAJ 4 JUNE TO...
- 04 June, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
गुरुदत्त वाकदेकर