डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दुर्मिळ छायाचित्रांचे भव्य प्रदर्शन….
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दुर्मिळ छायाचित्रांचे भव्य प्रदर्शन….
ठाणे - ठाण्यातील टाऊन हॉल, कोर्ट नाका येथे सुरू झालेल्या या प्रदर्शनात बाबासाहेबांच्या जीवनातील अनेक ऐतिहासिक आणि दुर्मिळ क्षणांचे छायाचित्रांद्वारे दर्शन घडत आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड आणि वरिष्ठ पत्रकार मिलिंद बल्लाळ यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी मनोज प्रधान यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. प्रदर्शनाला भेट देणाऱ्या नागरिकांनी बाबासाहेबांच्या कार्याचा आढावा घेत त्यांच्या विचारांप्रती आदर व्यक्त केला. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाच्या विकासासाठी महत्त्वाच्या संकल्पना मांडल्या, विशेषतः जलसंपत्ती आणि धरणांची कल्पना. पाश्चिमात्य देशांमध्ये बाबासाहेबांना मिळणारा सन्मान आणि भारतातील सन्मान यामध्ये तफावत दिसते. महात्मा ज्योतिराव फुले यांना बाबासाहेबांनी आपले गुरु मानले असे जितेंद्र आव्हाड यावेळी म्हणाले.
महाड सत्याग्रह काळातील संघर्ष आणि त्यावेळचे हल्ले हे सामाजिक वास्तव दाखवतात. बाबासाहेबांनी सर्व धर्मांचा सखोल अभ्यास केला आणि त्यावर आधारित विचार मांडले. भारताचे संविधान सर्वसमावेशक आहे, पण त्याचे उल्लंघन होताना आपण शांत राहतो. प्रत्येकाला आपल्या धर्माची निवड करण्याचा अधिकार संविधानाने दिला आहे. आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळात धार्मिक सहिष्णुता दिसून येते. सयाजीराव गायकवाड आणि छत्रपती शाहू महाराज यांनी बाबासाहेबांच्या गुणवत्तेची ओळख करून दिली असेही आव्हाड म्हणाले.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 2 APR TO...
- 02 April, 2026
ADHARSH SWARAJ 26 MAR TO...
- 26 March, 2026
ADHARSH SWARAJ 19 MAR TO...
- 19 March, 2026
ADHARSH SWARAJ 12 MAR TO...
- 12 March, 2026
ADHARSH SWARAJ 5 FEB TO...
- 05 February, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Mukesh S. Dhawade