नाशिकमधील द्राक्ष उत्पादक संकटात
नाशिकमधील द्राक्ष उत्पादक संकटात
नाशिक - जिल्ह्यातील द्राक्षबागांवर नैसर्गिक वातावरणातील बदलाचा मोठा परिणाम दिसून येत आहे. निफाड तालुक्यातील विंचूर परिसरात ढगाळ वातावरण असून सकाळी थंडी आणि ढगाळ हवेच्या कारणामुळे दुपारी उन्हाचा तडाखा बसत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. यामुळे द्राक्षांवर थेट परिणाम होऊन त्यांचे उत्पादन आणि गुणवत्ता दोन्ही प्रभावित होत आहेत.
शेतकऱ्यांच्या मते, गेल्या सहा महिन्यांपासून सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे बऱ्याच द्राक्षबागांमध्ये कापणी आणि देखभालीसाठी मोठा खर्च करावा लागला. काही द्राक्ष उत्पादकांनी जरी मोठा आर्थिक भार घेत आपल्या बागा वाचवल्या असल्या तरी, थंडी, ढगाळ वातावरण आणि उन्हाच्या तडाख्यामुळे द्राक्षांचे नुकसान होत आहे.
शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, आत्ता बाजारात मिळणारा भाव जरी काही प्रमाणात जास्त दिसत असला तरी त्यातून उत्पादनाचा खर्चही परत येत नाही. त्यामुळे द्राक्ष उत्पादक आर्थिक अडचणीत सापडले आहेत. शेतकऱ्यांनी केंद्र आणि राज्य सरकारकडे किमान एक लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याची मागणी जोरदारपणे केली आहे.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 9 JULY TO...
- 09 July, 2026
ADHARSH SWARAJ 2 JULY TO...
- 02 July, 2026
ADHARSH SWARAJ 25 JUNE...
- 25 June, 2026
ADHARSH SWARAJ 18 JUNE...
- 18 June, 2026
ADHARSH SWARAJ 4 JUNE TO...
- 04 June, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Mukesh S. Dhawade