सचिन अहिर सामान्यांच्या प्रश्नावर लढणारे लढाऊ व्यक्तिमत्व! खासदार अरविंद सावंत
सचिन अहिर सामान्यांच्या प्रश्नावर लढणारे लढाऊ व्यक्तिमत्व! खासदार अरविंद सावंत
मुंबई - आज राजकारणात बरीच माणसे इकडून तिकडे पळत आहेत.परंतु सचिन अहिर असे व्यक्तिमत्व आहे की,पक्षात आले ते नुसते स्थिरावलेच नाहीत तर मजबूतिने काम करीत आहेत! ते एक निष्ठावंत शिवसैनिक तर आहेतच! परंतु पक्षप्रमुख आदरणीय उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली विधान परिषदेत मुंबई शहरातील सर्वसामा न्यांच्या विशेषतःगिरणी कामगारांच्या प्रश्नावर तुटून पडत आहेत! असे गौरवोद्गार उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी येथे गिरणी कामगारांच्या मेळाव्यात बोलताना कामगार नेते सचिन अहिर यांचा गुणगौरव करतांना काढले.
राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे अध्यक्ष आमदार सचिनआहिर यांचा वाढदिवस आणि ते नेतृत्व करीत असलेल्या महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघाचा ३० वा वर्धापनदिन काल परेलच्या महात्मा गांधीसभाग्रहात मोठ्या थाटामाटात संपन्न झाला,त्यावेळी माजी केंद्रीयमंत्री आणि विद्यमान खासदार अरविंद सावंत आमदार सचिन अहिर यांचे अभिष्टचिंतन करताना बोलत होते. प्रारंभी सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांच्या हस्ते अध्यक्ष आमदार सचिनभाऊ आहिर यांचा शाल शिफळ देऊन सन्मान करण्यात आला. अध्यक्ष सचिन अहिर यांच्या कन्या ऐश्वर्या यांचाही वाढदिवसानिमित्त येथोचित सन्मान करण्यात आला.
त्यावेळी खासदार अरविंद सावंत,सचिन अहिर यांचा गुणगौरव करताना पुढे म्हणाले, ते निश्चितच चाणक्य आहेत,याचे कारण विधानपरिषदेत
जरा जरी चुकीचे विधान केले गेले तर त्याचा खुलासा करून घेतल्या शिवाय ते गप्प बसत नाहीत.तेव्हा सामान्यांच्या प्रश्नावर शासकीय स्तरावर चलढकलपणा स्वीकारून जर त्रास देण्याचा प्रयत्न झाला तर आम्ही धडाकेबाज कामातून ते दाखवून देऊ,असाही निग्रह खासदार अरविंद सावंत यांनी येथे कामगारांच्या मेळाव्यात बोलताना व्यक्त केला.खासदार अरविंद सावंत यांनी अहिर यांच्या कन्या कुमारी ऐश्वर्या यांचाही वाढदिवसानिमित्त गुणगौरव केला आहे. त्यावेळी सरचिटणीस गोविंदराव मोहिते म्हणाले,सचिनभाऊ अहिर यांनी तोंडात साखर आणि डोक्यावर बर्फ ठेवून,युनियनचे काम संपूर्ण महाराष्ट्रासह गुजरातपर्यंत वृद्धिंगत केले आहे. संघर्ष आणि संयम यांची अचूक सांगड घालत राज्याच्या विविध औद्योगिक क्षेत्रात त्यांनी युनियनचे कार्य विस्तारत नेले आहे.
याप्रसंगी गिरणी कामगार संयुक्त लढा समितीचे नेते ऍड. बबन मोरे,सत्यवान उभे, रमाकांत बने आदींनी आपल्या भाषणात अध्यक्ष सचिन अहिर यांना शुभेच्छा दिल्या आहेत.आमदार अजय चौधरी तसेच मुंबई पुण्याकडील अनेक लोकप्रतिनिधींनी सचिन अहिर यांना भेटून शुभेच्छा दिल्या आहेत.याप्रसंगी महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघाचे पदाधिकारी सर्वश्री राजन लाड,मिलिंद तांबडे,सुनील अहिर,उत्तम गीते,संजय कदम,
विजय काळोखे,सुनील बोरकर,बजरंग चव्हाण , शिवाजी काळे,साई कुमार निकम,किशोर रहाटे,अवधेश पांड्ये,विश्वनाथ सावंत आदी पदाधिकारी आवर्जून उपस्थित होते. अध्यक्ष सचिन अहिर यांचा वाढदिवस आणि युनियनचा वर्धापन कामगार प्रतिनिधींनी रक्तदान,वृक्षारोपण,क्रीडा सामने आदी सार्वजनिक उपक्रमाने संपन्न केला.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 9 JULY TO...
- 09 July, 2026
ADHARSH SWARAJ 2 JULY TO...
- 02 July, 2026
ADHARSH SWARAJ 25 JUNE...
- 25 June, 2026
ADHARSH SWARAJ 18 JUNE...
- 18 June, 2026
ADHARSH SWARAJ 4 JUNE TO...
- 04 June, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Karishma Sawant