AI ने लॅबमध्ये तयार केले 16 कृत्रिम व्हायरस
AI ने लॅबमध्ये तयार केले 16 कृत्रिम व्हायरस
कॅलिफोर्निया-: AI च्या वापरामुळे भविष्यात अनेक गंभीर आजारांचा सामना करणे शक्य होणार आहे. असेच एक महत्त्वाचे संशोधन अमेरिकन शास्त्रज्ञांनी केले आहे. स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी ‘ईवो’ (Evo) नावाच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) मॉडेलचा वापर करून लॅबमध्ये १६ कृत्रिम विषाणू (बॅक्टेरियोफेज) यशस्वीपणे तयार केले आहेत. हे विषाणू निसर्गात अस्तित्वात नाहीत आणि ते मानवांना नव्हे तर केवळ विशिष्ट बॅक्टेरियाना (E. coli) संसर्ग करून नष्ट करू शकतात.
ईवो’ या जनरेटिव्ह AI मॉडेलला लाखो जीनोम आणि डीएनर पॅटर्न्सच्या आधारे जेनेटिक कोड वाचण्याची व तयार करण्याची प्रशिक्षण दिले गेले होते.चाचणी: संशोधकांनी एआयने डिझाइन केलेले सुमारे ३०० कृत्रिम डीएनए लॅबमध्ये तयार केले व बॅक्टेरियामध्ये सोडले, त्यापैकी १६ पूर्णपणे कार्यक्षम आणि सक्रिय निघाले.
फायदा: अँटिबायोटिक औषधांना न जुमानणाऱ्या (Antibiotic-resistant) घातक बॅक्टेरियांचा বিरोध करण्यासाठी भविष्यात अशा एआय-निर्मित उपचारांचा (Phage Therapy) मोठा फायदा होऊ शकतो.
बायोसेफ्टी आणि धोकेसुरक्षेची चिंता: हे विषाणू मानवांसाठी घातक नसले तरी, अशा तंत्रज्ञानाचा गैरवापर करून भविष्यात खतरनाक जैविक शस्त्रे (Bioweapons) तयार केली जाऊ शकतात, अशी भीती आरोग्य तज्ज्ञांनी आणि ‘जॉन्स हॉपकिन्स सेंटर फॉर हेल्थ सिक्युरिटी’ने व्यक्त केली आहे.
नियमनाची गरज: एआयद्वारे जीवशास्त्रातील मूलभूत घटक बदलण्याच्या या क्षमतेवर कडक आंतरराष्ट्रीय नियमांची आणि नियंत्रणाची गरज असल्याचे वैज्ञानिकांचे म्हणणे आहे.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 9 JULY TO...
- 09 July, 2026
ADHARSH SWARAJ 2 JULY TO...
- 02 July, 2026
ADHARSH SWARAJ 25 JUNE...
- 25 June, 2026
ADHARSH SWARAJ 18 JUNE...
- 18 June, 2026
ADHARSH SWARAJ 4 JUNE TO...
- 04 June, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Karishma Sawant