दुबईतून भारतात स्वस्त सोने आणण्यास मुदतवाढ
दुबईतून भारतात स्वस्त सोने आणण्यास मुदतवाढ
नवी दिल्ली - केंद्र सरकारने भारत-यूएई मुक्त व्यापार करार, CEPA, अंतर्गत सोन्याच्या आयातीसाठी जारी करण्यात येणाऱ्या टॅरिफ रेट कोटा किंवा TRQ परवान्यांची अंतिम मुदत वाढवली आहे. याआधी 31 मार्च 2026 रोजी मुदत संपणाऱ्या TRQ परवान्यांना आता 30 जून 2026 पर्यंत मुदतवाढ दिली गेली आहे. भू-राजकीय संकटामुळे आयातदार या कोट्याचा पूर्णपणे वापर करू शकले नसल्याने सरकारने आता जूनपर्यंत अतिरिक्त मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे.
टॅरिफ रेट कोटा किंवा TRQ अंतर्गत सरकार एका विशिष्ट प्रमाण म्हणजे कोट्यापर्यंत वस्तूंच्या आयातीवर कमी सीमा शुल्क आकारते.भारत-यूएई CEPA अंतर्गत एका विशिष्ट कोट्यापर्यंत सोन्याच्या आयातीवर 1% शुल्क सवलत दिली जाते, जी केवळ गैर-मौद्रिक सोनं, म्हणजेच सोन्याच्या विटा किंवा नैसर्गिक सोन्याला लागू होते.
दागिन्यांवर ही सूट लागू होत नाही. म्हणजे एखाद्या सराफाने या कोट्याअंतर्गत सोन्याची आयात केल्यास त्यांना इतर देशांमधून सोने आयात करण्याच्या तुलनेत 1% कमी शुल्क भरावे लागेल. सोन्याची आयात कोट्यवधी रुपयांची असते, त्यामुळे ही 1% कपात सराफा उद्योगासाठी एक मोठा दिलासा ठरेल.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 19 MAR TO...
- 19 March, 2026
ADHARSH SWARAJ 12 MAR TO...
- 12 March, 2026
ADHARSH SWARAJ 5 FEB TO...
- 05 February, 2026
ADHARSH SWARAJ 29 JAN TO...
- 29 January, 2026
ADHARSH SWARAJ 15 JAN TO...
- 15 January, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Mukesh S. Dhawade