भायखळ्यात आमदार चषक 2025 ही भव्य हॉलीबॉल स्पर्धा संपन्न
भायखळ्यात आमदार चषक 2025 ही भव्य हॉलीबॉल स्पर्धा संपन्न
मुंबई : पावसाची रिमझिम आणि खेळाडूंच्या ओसंडून वाहण्राया जल्लोषपूर्ण वातावरणात शिवसेना भायखळा, शाखा क्र. 210 आयोजित आमदार चषक 2025 ही भव्य हॉलीबॉल स्पर्धा माझगाव संपन्न झाली. तब्बल 16 संघांचा सहभाग असलेल्या या स्पर्धेत गणेश इलेव्हन हत्तीबाग या संघाने विजेतेपद तर ताराबाग सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ संघाने उपविजेतेपद पटकावले. माझगावच्या लाल मैदान संघाला तिसरे तर ताडवाडीच्या प्रतिज्ञा क्रीडा मंडळाला चौथे स्थान मिळाले.
भायखळा परिसरातील तब्बल 16 संघांच्या सहभागामुळे ही स्पर्धा लक्षवेधी ठरली. रविवारी रात्री उशिराने स्पर्धेचे उपांत्य आणि अंतिम फेरीचे सामने झाले. विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. पावसाच्या रिमझिम हजेरीने खेळाडूंचा उत्साह आणखी वाढत होता. सध्या सर्वत्र क्रिकेट आणि कबड़ी स्पर्धांचा बोलबाला असताना हॉलीबॉलसारखी स्पर्धा यशस्वी केल्याबद्दल संयोजकांचे क्रीडाप्रेमींनी विशेष कौतुक केले. शिवसेना भायखळा विधानसभा समन्वयक संतोष राणे आणि शाखा क्र. 210 चे शाखाप्रमुख राकेश खानविलकर यांनी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी विशेष मेहनत घेतली. उदघाटन समारंभाला तसेच पारितोषिक वितरण समारंभाला शिवसेनेचे भायखळा विधानसभाप्रमुख विजय लिपारे, समन्वयक संतोष राणे, शिवसेनेतील अन्य सहकारी उपस्थित होते.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
24 SEPT TO 30 SEPT 2026...
- 24 September, 2026
ADHARSH SWARAJ 9 JULY TO...
- 09 July, 2026
ADHARSH SWARAJ 2 JULY TO...
- 02 July, 2026
ADHARSH SWARAJ 25 JUNE...
- 25 June, 2026
ADHARSH SWARAJ 18 JUNE...
- 18 June, 2026
आम्हाला फॉलो करा
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
सेलिब्रिटी बर्थडे
Navjot singh sidhu
- जन्मदिन
- October 20
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Karishma Sawant