चेक बाऊन्स प्रकरणी अभिनेता राजपाल यादव विरोधात अटक वॉरंट
चेक बाऊन्स प्रकरणी अभिनेता राजपाल यादव विरोधात अटक वॉरंट
मुंबई - अभिनेता राजपाल यादवने चेक बाऊन्स प्रकरणात ट्रायल कोर्टाने दिलेल्या शिक्षेविरोधात आणि शरणागतीच्या आदेशातून दिलासा मिळावा या अपेक्षेने त्याने दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र न्यायमूर्ती स्वर्ण कांता शर्मा यांनी राजपाल यादवची याचिका फेटाळून लावत आजच म्हणजे 4 फेब्रुवारी रोजी सरेंडर करण्याचे आदेश दिले आहेत. आज शरण न आल्यास त्याला कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते.
सुनावणीदरम्यान कोर्टाने स्पष्ट शब्दांत सांगितले की, राजपाल यादवला याआधीच सरेंडर करण्यासाठी दोन दिवसांची मुदत देण्यात आली होती. त्यावेळी त्याने आपण मुंबईत असल्याचे कारण दिले होते. मात्र आता नरमी दाखवण्यास कोणताही ठोस आधार नसल्याचे कोर्टाने नमूद केले. न्यायालयाने स्पष्ट केले की, ‘तुम्हाला आधीच वेळ देण्यात आला होता. आता आणखी सवलत देण्याचं कारण दिसत नाही.’
राजपाल यादवच्यावतीने न्यायालयात हजर असलेल्या वकिलांनी युक्तिवाद केला की, जर एक आठवड्याची मुदत देण्यात आली तर तो संपूर्ण रक्कम अदा करेल. वकिलांनी असा दावा केला की, राजपाल यादवने 50 लाख रुपयांची व्यवस्था केली आहे आणि त्याचे पुरावेही सादर केले आहेत. तसेच तो 5 फेब्रुवारी रोजी पैसे घेऊन न्यायालयात येईल असेही सांगण्यात आले.
मात्र, कोर्टाने हा युक्तिवाद फेटाळून लावत कोणतीही अतिरिक्त मुदत देण्यास स्पष्ट नकार दिला. हायकोर्टाच्या या निर्णयानंतर राजपाल यादव याच्याकडे जेल प्रशासनासमोर शरणागती पत्करण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय उरलेला नाही.
प्रकरणाची पार्श्वभूमी
हे प्रकरण 5 कोटी रुपयांच्या आर्थिक व्यवहाराशी संबंधित आहे. तक्रारदार मुरली प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने असा आरोप केला आहे की, 2010 साली राजपाल यादवच्या कंपनीला एक चित्रपट पूर्ण करण्यासाठी 5 कोटी रुपयांचे कर्ज देण्यात आले होते. दोघांमध्ये असा करार झाला होता की, राजपाल यादव व्याजासह 8 कोटी रुपये परत करतील.
मात्र, राजपाल यादवने पैसे परत न करता वारंवार दिलेले चेक बाऊन्स झाले. राजपाल यादवने बचाव करताना असा दावा केला होता की, हे पैसे कर्ज नसून कंपनीकडून केलेली गुंतवणूक होती. तरीही न्यायालयाने त्याला चेक बाऊन्स प्रकरणात दोषी ठरवले.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 9 JULY TO...
- 09 July, 2026
ADHARSH SWARAJ 2 JULY TO...
- 02 July, 2026
ADHARSH SWARAJ 25 JUNE...
- 25 June, 2026
ADHARSH SWARAJ 18 JUNE...
- 18 June, 2026
ADHARSH SWARAJ 4 JUNE TO...
- 04 June, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Karishma Sawant