नारायण सुर्वे साहित्य संमेलनात गिरणगावचे रंगकर्मी राघवकुमार,कथालेखक काशिनाथ माटल यांना पुरस्कार जाहीर!
नारायण सुर्वे साहित्य संमेलनात गिरणगावचे रंगकर्मी राघवकुमार,कथालेखक काशिनाथ माटल यांना पुरस्कार जाहीर!
मुंबई - मराठी साहित्यात आपल्या दर्जेदार काव्यातून नवी वाट निर्माण करणारे नारायण सुर्वे यांच्या स्मृतींना उजाळा देण्या साठी, स्वामीराज प्रकाशनच्या वतीने प्रभादेवी येथील पु.ल.देशपांडे कला आकादमीमध्ये येत्या २७ आणि २८ मार्च रोजी सायंकाळी साडे तीन नंतर दोन दिवशीय सुर्वे मास्तरांचे साहित्य संमेलन पार पडत आहे.
आधिवेशनाचे उद्घाटन २७ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजता राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते होणार आहे.
पहिल्या दिवशी २७ रोजी गिरणगावातील सांस्कृतिक चळवळी त नाट्य लेखक,नाट्य दिग्दर्शक,रंगकर्मी म्हणून योगदान देणारे के.राघवकुमार यांना सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते कै.बाबाजी धोंडू शेलार स्मृती पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
दुस-या दिवशी दि.२८ रोजी गिरणगातीलच एक कसदार कथा लेखक म्हणून नावारूपाला आलेले काशिनाथ माटल यांचा कै.कुमुद गजानन रेगे स्मृती,स्वामीराज पुरस्काराने मराठी भाषामंत्री उदय सामंत यांच्या हस्ते उचित सन्मान करण्यात येणार आहे.
बहुचर्चित “गांधी टॉल्क”हिंदी फिल्मचे दिग्दर्शक किशोर बेळेकर यांचा २७ रोजी मा.आशिष शेलार यांच्य हस्ते विशेष पुरस्काराने सन्मान होणार आहे.
संमेलनाचे अध्यक्ष नाट्य लेखक दिग्दर्शक केदार शिंदे असून,स्वागताध्य गिरणगावातील नगरसेवक किरण तावडे आहेत.याप्रसंगी माजी संमेलनाध्यक्ष अभिनेते प्रमोद पवार,ज्येष्ठ अभिनेते शिवाजी साटम उपस्थित राहणार आहेत.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 2 APR TO...
- 02 April, 2026
ADHARSH SWARAJ 26 MAR TO...
- 26 March, 2026
ADHARSH SWARAJ 19 MAR TO...
- 19 March, 2026
ADHARSH SWARAJ 12 MAR TO...
- 12 March, 2026
ADHARSH SWARAJ 5 FEB TO...
- 05 February, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
गुरुदत्त वाकदेकर