एकशे आठ क्रमांकाच्या रुग्णवाहिकांच्या तक्रारींची चौकशी
एकशे आठ क्रमांकाच्या रुग्णवाहिकांच्या तक्रारींची चौकशी
मुंबई -१०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकांच्या कामाबाबत तक्रारी होत्या त्यासाठी चौकशी समिती नेमली आहे, त्याच्या अहवालानंतर त्यांच्या वर करवाई करण्यात येईल अशी माहिती सार्वजनिक आरोग्य विभागाचे मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली याबाबत चा मूळ प्रश्न गोपीचंद पडळकर यांनी उपस्थित केला होता त्यावर राजेश पवार, भास्कर जाधव, शरद सोनवणे यांनी उपप्रश्न विचारले.
या क्रमांकावर शहरी भागात वीस मिनिटात आणि ग्रामीण भागात तीस मिनिटात ही रुग्णवाहिका उपलब्ध झाली पाहिजे, आताच्या रुग्णवाहिका केवळ ९०० होत्या आता अधिक निधी उपलब्ध करून १७३७ रुग्णवाहिका उपलब्ध होणार आहेत. त्या उभ्या करण्याची ठिकाणे देखील नेमून दिल्या जातील अशी माहिती देखील मंत्री आबिटकर यांनी दिली. रुग्णवाहिका पूर्वी केवळ शंभर किमी पर्यंत होती ती आता वाढवून दिली जाईल असं ही मंत्र्यांनी सांगितलं.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 9 JULY TO...
- 09 July, 2026
ADHARSH SWARAJ 2 JULY TO...
- 02 July, 2026
ADHARSH SWARAJ 25 JUNE...
- 25 June, 2026
ADHARSH SWARAJ 18 JUNE...
- 18 June, 2026
ADHARSH SWARAJ 4 JUNE TO...
- 04 June, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Mukesh S. Dhawade