Fastag वार्षिक पास १ एप्रिलपासून महागणार
Fastag वार्षिक पास १ एप्रिलपासून महागणार
मुंबई - 1 एप्रिलपासून राष्ट्रीय महामार्गावर प्रवास महागणार आहे. रस्ते वाहतूक मंत्रालयाने फास्टॅग (FASTag) वार्षिक पासच्या किमतीत 2.5% वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. आता खाजगी वाहन मालकांना वार्षिक पाससाठी 3,000 रुपयांऐवजी 3,075 रुपये द्यावे लागतील. या पासमुळे पास कार वापरकर्त्यांना देशभरातील 200 टोल प्लाझावर न थांबता प्रवास करता येतो. 52 लाखांहून अधिक हायवे कार वापरकर्ते या सुविधेचा लाभ घेत आहेत.
रस्ते वाहतूक मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनुसार, जेव्हा फास्टॅग वार्षिक पास सुरू करण्यात आला होता, तेव्हाच त्याच्या अधिसूचनेत दरवर्षी किमतींचे पुनरावलोकन आणि बदलाची तरतूद ठेवण्यात आली होती. ही वाढ त्याच वार्षिक पुनरावलोकन प्रक्रियेचा भाग आहे. देशभरातील महामार्ग टोल दरांमध्ये बदल करण्यासाठी जे सूत्र निश्चित केले आहे, त्याच आधारावर यावेळी 2.5% वाढ करण्यात आली आहे.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 9 JULY TO...
- 09 July, 2026
ADHARSH SWARAJ 2 JULY TO...
- 02 July, 2026
ADHARSH SWARAJ 25 JUNE...
- 25 June, 2026
ADHARSH SWARAJ 18 JUNE...
- 18 June, 2026
ADHARSH SWARAJ 4 JUNE TO...
- 04 June, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
गुरुदत्त वाकदेकर