केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ
केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ
नवी दिल्ली-: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने भाववाढीची भरपाई करण्यासाठी, मूळ वेतन/पेन्शनच्या सध्याच्या 58% दरामध्ये 2% वाढ करून, केंद्रीय सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना 01.01.2026 पासून महागाई भत्त्याचा (DA) आणि महागाई दिलाशाचा (DR) अतिरिक्त हप्ता जारी करण्यास मंजुरी दिली आहे.
मागील सुधारणा 1 जुलै 2025 पासून लागू झाली होती आणि ती थकबाकीसह देण्यात आली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज (18 एप्रिल) दिल्लीत झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत ही घोषणा करण्यात आली. याचा फायदा अंदाजे 50.5 लाख कर्मचारी आणि 68.3 लाख निवृत्तीवेतनधारकांना होईल. केंद्र सरकार वर्षातून दोनदा, जानेवारी आणि जुलैमध्ये महागाई भत्ता (डीए) आणि महागाई सवलतीत (डीआर) सुधारणा करते. या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांच्या मासिक पगारात आणि निवृत्तीवेतनधारकांच्या पेन्शनमध्ये वाढ होते.
महागाई भत्ता (DA) हा सरकारी कर्मचाऱ्यांना दिला जाणारा एक जीवनमान भत्ता आहे. त्याची गणना मूळ वेतनाच्या टक्केवारीनुसार केली जाते. वाढत्या किमतींच्या काळात कर्मचाऱ्यांच्या वास्तविक उत्पन्नाचे संरक्षण करणे आणि त्यांचे वेतन महागाईच्या बरोबरीने राहील याची खात्री करणे, हा त्याचा मुख्य उद्देश आहे.
महागाई भत्ता आणि महागाई दिलासा या दोन्हीतील वाढीमुळे सरकारी तिजोरीवर दरवर्षी एकूण 6791.24 कोटी रुपयांचा भार पडणार आहे. याचा फायदा सुमारे 50.46 लाख केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना आणि 68.27 लाख पेन्शनधारकांना होईल. ही वाढ सातव्या केंद्रीय वेतन आयोगाच्या शिफारशींवर आधारित स्वीकारलेल्या सूत्रानुसार करण्यात आली आहे.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 2 APR TO...
- 02 April, 2026
ADHARSH SWARAJ 26 MAR TO...
- 26 March, 2026
ADHARSH SWARAJ 19 MAR TO...
- 19 March, 2026
ADHARSH SWARAJ 12 MAR TO...
- 12 March, 2026
ADHARSH SWARAJ 5 FEB TO...
- 05 February, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Mukesh S. Dhawade