काळ्या हळदीला सोन्याचा भाव! तब्बल २१,१५० उच्चांकी दर
काळ्या हळदीला सोन्याचा भाव! तब्बल २१,१५० उच्चांकी दर
वाशीम -: वाशीम कृषी उत्पन्न बाजार समितीत काळ्या हळदीला म्हणजेच ‘कोच्या’ हळदीला यंदा विक्रमी दर मिळत असून तब्बल २१ हजार १५० रुपये प्रति क्विंटल असा उच्चांक नोंदवला गेला आहे. लागवडी दरम्यान बियाणे म्हणून वापरलेली हळद जमिनीत कालांतराने सडून वाळते, तिलाच ‘कोच्या’ किंवा काळी हळद म्हटले जाते.
औषधी गुणधर्मांनी समृद्ध असलेली ही काळी हळद संधिवात, यकृताचे विकार, तसेच त्वचारोगांवर उपयुक्त मानली जाते. त्यामुळे बाजारात तिची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. सध्या शेतात मशागतीची कामे सुरू असताना जमिनीतून कोच्या हळद बाहेर येत असून, या हळदीला व्यापाऱ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. विशेष म्हणजे इतर हळदीच्या तुलनेत काळ्या हळदीला सर्वाधिक दर मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 2 APR TO...
- 02 April, 2026
ADHARSH SWARAJ 26 MAR TO...
- 26 March, 2026
ADHARSH SWARAJ 19 MAR TO...
- 19 March, 2026
ADHARSH SWARAJ 12 MAR TO...
- 12 March, 2026
ADHARSH SWARAJ 5 FEB TO...
- 05 February, 2026
आम्हाला फॉलो करा
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Karishma Sawant