करी रोड पदपथांवरील हायड्रेलमुळे पादचारी हैराण
करी रोड पदपथांवरील हायड्रेलमुळे पादचारी हैराण
मुंबई - करी रोड येथील महादेव पालव मार्गावरील पदपथावर मध्यभागी इमर्जन्सी अग्निशमन पाण्याचे हायड्रेल असल्याने पादचाऱ्यांना ये जा करणे फार त्रासदायक झाले आहे. फोनवर बोलताना तसेच लक्ष नसताना चालताना हे हायड्रेल पायामध्ये अडकून अपघाताच्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. करी रोड, लालबाग परिसरात मोठ्या प्रमाणात होलसेल मार्केट असल्याने या ठिकाणी नागरिकांचे मोठ्या प्रमाणात गर्दी असते. तसेच या ठिकाणी करी रोड रेल्वे स्थानक असल्यामुळे या ठिकाणी नागरिकांची आणि चाकरमान्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते. त्यांना देखील या मध्यभागी असलेल्या हायडेलचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तरी हे पद पताचे मध्यभागी असणारे हायडल त्वरित काढावे आणि नागरिकांना पद पद मोकळा करावा अशी मागणी स्थानिक रहिवासी,दुकानदार आणि पदाचारी करत आहेत. मी लालबाग येथे राहत असल्याने रोज याच पदपथवरून ये जा करत असतो. हे हायड्रेल पदपथावर मध्यभागी असल्याने पादचाऱ्यांना आणि नागरिकांना दिसत नाही त्यामुळे यामध्ये पाय अडकून मोठ्या प्रमाणात बदल होत आहे. हे हायड्रेल बाजूला शिफ्ट करण्याबाबत मी वारंवार महापालिका प्रशासनाकडे तक्रार केली होती परंतु अजूनही या हायड्रेलवर कोणतीच कारवाई झाली नसल्याचे माहिती समाजसेवक महेंद्र तावडे यांनी दिली.
महादेव पालव मार्गावरील पदपथावर मध्यभागी असणारे हायड्रेल बाबत माझ्याकडे अनेक तक्रारी प्राप्त झाले आहेत त्यानुसार मी मुंबई महापालिकेच्या संबंधित विभागाला पत्र दिलेले आहे त्यावर लवकरच कारवाई होईल आणि हे हायड्रल बाजूला करण्यात येईल अशी माहिती स्थानिक नगरसेवक किरण तावडे यांनी दिली.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 2 APR TO...
- 02 April, 2026
ADHARSH SWARAJ 26 MAR TO...
- 26 March, 2026
ADHARSH SWARAJ 19 MAR TO...
- 19 March, 2026
ADHARSH SWARAJ 12 MAR TO...
- 12 March, 2026
ADHARSH SWARAJ 5 FEB TO...
- 05 February, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Karishma Sawant