या प्रवाशांना विमानामध्ये ‘नो एन्ट्री’
या प्रवाशांना विमानामध्ये ‘नो एन्ट्री’
मुंबई-: गेल्या काही वर्षांत हवाई प्रवास करणाऱ्यांची संख्या विक्रमी वाढली आहे. मात्र, दुसरीकडे विमान प्रवासादरम्यान प्रवाशांच्या गैरवर्तनामुळे एअरलाइन्स कंपन्या चिंतेत आहेत. केबिन क्रू सदस्यांशी गैरवर्तन, शिवीगाळ, विमानात धूम्रपान, मद्यपान अवस्थेत गैरप्रकार करणे अशा अनेक घटनांनी गंभीर प्रश्न निर्माण केले आहेत. या पार्श्वभूमीवर नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) नवीन नियम लागू केले आहेत. या नियमांनुसार गैरवर्तन करणाऱ्या प्रवाशांवर त्यांच्या कृतीच्या गांभीर्यानुसार विमान प्रवासावर बंदी घालण्यात येईल. ही बंदी किमान तीन दिवसांपासून ते दोन वर्षे किंवा त्याहून अधिक काळासाठी लागू होऊ शकते.
नवीन नियमांनुसार एअरलाइन्सची जबाबदारी
- प्रवाशाने गैरवर्तन केल्यास त्याची माहिती तातडीने चेक-इन काउंटर किंवा विमानतळावरील तपास यंत्रणांना द्यावी.
- गंभीर गैरवर्तन देशाच्या सुरक्षेसाठी धोका ठरल्यास त्यावर कठोर कारवाई होईल.
- संबंधित प्रवाशाची माहिती केंद्रीय गृहमंत्रालयाला आणि इतर विमान कंपन्यांनाही देणे बंधनकारक असेल.
गैरवर्तनाच्या पातळ्या आणि शिक्षा
- पहिली पातळी: शिवीगाळ किंवा हुज्जत घातल्यास किमान तीन महिन्यांची प्रवासबंदी.
- दुसरी पातळी: शारीरिक हिंसाचार केल्यास तीन ते सहा महिन्यांची प्रवासबंदी.
- तिसरी व चौथी पातळी: जीवे मारण्याची धमकी देणे किंवा विमानाला इजा पोहोचवण्याचा प्रयत्न केल्यास किमान दोन वर्षे किंवा गुन्ह्याच्या प्रकारानुसार कायमस्वरूपी प्रवासबंदी.
थोडक्यात, विमान प्रवास सुरक्षित आणि शिस्तबद्ध राहावा यासाठी डीजीसीएने कठोर नियम लागू केले आहेत. यामुळे प्रवाशांच्या गैरवर्तनावर आळा बसून एअरलाइन्स कंपन्यांना सुरक्षित वातावरण निर्माण करण्यास मदत होईल.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 2 APR TO...
- 02 April, 2026
ADHARSH SWARAJ 26 MAR TO...
- 26 March, 2026
ADHARSH SWARAJ 19 MAR TO...
- 19 March, 2026
ADHARSH SWARAJ 12 MAR TO...
- 12 March, 2026
ADHARSH SWARAJ 5 FEB TO...
- 05 February, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Karishma Sawant