‘सीबीएसई’ दहावी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा महापौर श्रीमती रितू तावडे, महानगरपालिका आयुक्त श्रीमती अश्विनी भिडे यांनी केला सत्कार
‘सीबीएसई’ दहावी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा महापौर श्रीमती रितू तावडे, महानगरपालिका आयुक्त श्रीमती अश्विनी भिडे यांनी केला सत्कार
मुंबई-बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागामार्फत संचलित केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई) संलग्न ११ शाळांच्या विद्यार्थ्यांनी इयत्ता दहावी परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. या यशवंत विद्यार्थ्यांचा मुंबईच्या महापौर श्रीमती रितू तावडे, महानगरपालिका आयुक्त श्रीमती अश्विनी भिडे यांनी आज (दिनांक १६ एप्रिल २०२६) महानगरपालिका मुख्यालयात सत्कार केला. यासह महानगरपालिकेच्या सभागृहानेही यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) इयत्ता दहावीच्या परीक्षेत बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शाळांचा एकूण निकाल ९२.८९ टक्के इतका लागला आहे. महानगरपालिकेच्या शाळांमध्ये मिठागर सीबीएसई शाळेतील कुमारी आर्या लामने (९७.८ टक्के) हीने प्रथम क्रमांक पटकावला आहे. तसेच पूनम नगर शाळेतील सौरभ यादव (९७.२ टक्के), राजावाडी शाळेतील कौस्तुभ त्रिपाठी (९७ टक्के), पूनम नगर शाळेतील आर्यन मयेकर (९६.६ टक्के) आणि श्रेया सिंग (९६.४ टक्के), मिठागर शाळेतील माही सोळंकी (९६.२ टक्के) या विद्यार्थ्यांनीही सर्वाधिक गुण मिळविले आहेत. तसेच अनेक विद्यार्थ्यांनी मराठी विषयात शंभर गुण मिळविले आहेत. कौतुकाची बाब म्हणजे मराठी विषयात शंभर टक्के गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये अ मराठी विद्यार्थ्यांचाही समावेश आहे. महानगरपालिका सातत्याने मराठीच्या संवर्धनासाठी राबवित असलेल्या विविध उपक्रमांचे हे यश असल्याचे यातून दिसून येते.
या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा महापौर दालनात महापौर श्रीमती रितू तावडे यांनी, शिक्षण समिती अध्यक्ष श्रीमती राजेश्री शिरवडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत सत्कार केला. महापौर श्रीमती रितू तावडे, शिक्षण समिती अध्यक्ष श्रीमती राजेश्री शिरवडकर यांनी शिक्षण विभागाच्या कामगिरीवर समाधान व्यक्त केले. तसेच विद्यार्थ्यांशी संवाद साधला. नगरसेवक श्री. प्रकाश दरेकर, नगरसेविका श्रीमती राखी जाधव, नगरसेवक श्री. तेजिंदर सिंग तिवाना, नगरसेवक श्री. प्रकाश गंगाधरे, उप आयुक्त (शिक्षण) डॉ. (श्रीमती) प्राची जांभेकर यांच्यासह इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते.
महानगरपालिका आयुक्त श्रीमती अश्विनी भिडे यांनी देखील आयुक्त दालनात यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार केला. उप आयुक्त (शिक्षण) डॉ. (श्रीमती) प्राची जांभेकर, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) श्रीमती सुजाता खरे, उपशिक्षणाधिकारी श्रीमती ममता राव, मुख्याध्यापक, शिक्षक उपस्थित होते.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 2 APR TO...
- 02 April, 2026
ADHARSH SWARAJ 26 MAR TO...
- 26 March, 2026
ADHARSH SWARAJ 19 MAR TO...
- 19 March, 2026
ADHARSH SWARAJ 12 MAR TO...
- 12 March, 2026
ADHARSH SWARAJ 5 FEB TO...
- 05 February, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Mukesh S. Dhawade