मुंबई महापालिकेतील अपात्र महिलांना मिळणार शिलाई मशीन
मुंबई महापालिकेतील अपात्र महिलांना मिळणार शिलाई मशीन, घरघंटीनगरसेवक रोहिदास लोखंडे यांच्या प्रयत्नांना यश
मुंबई - मुंबई महानगरपालिका महिला बालकल्याण विभागाच्या मार्फत शिलाई मशीन आणि घरघंटी बचत गटाच्या महिलांना दिली जाते. परंतु काहीतरी राहिल्यामुळे या शिलाई मशीन आणि घरघंटी या बचत गटाच्या महिलांना मिळाली नाही. याचा पाठपुरावा भायखळा येथील भाजपा नगरसेवक रोहिदास लोखंडे यांनी केला आणि या बचत गटाच्या महिलांना शिलाई मशीन आणि घरघंटी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला. सन २०२३ साली मुंबई महापालिकेच्या वतीने हे फॉर्म महिलांकडून बनून घेण्यात आले होते. सन २४-२५ ला त्याची लॉटरी सुद्धा झाली आणि त्याच्यामध्ये काही महिलांना मशीन्स मिळाल्या, पण काही महिला अपात्र झाल्या.भायखळा विधानसभेच्या ‘ई’ वॉर्ड मधील १०७ महिला अपात्र झाल्या होत्या. अशा मुंबई शहरातील सर्वच वॉर्डमधून ३२११ महिला रिजेक्ट झाल्या, ही मला माहिती मिळाली. मी आठ महिन्यांपासून सीडीओ (CDO) च्या मार्फत प्रयत्न करत होतो की, या महिलांचे फॉर्म आपण रिजेक्ट का केले? तर त्या महिलांना याची काहीच माहिती नाही.
अधिकारी सांगतायत की त्यांचे ‘कार्ड स्वाईप’ झालं नाही, त्यांचे पैसे पोहोचले नाही म्हणून त्या कॅन्सल झाल्या. मग मी महापौर मुंबई महानगरपालिका रितू ताई तावडे यांच्याकडे एक बैठक लावली. महिला बालकल्याणचे अधिकारी त्याच्यामध्ये आले आणि मग त्या बैठकीमध्ये मी सर्व माझी बाजू मांडून सांगितली की, या महिला वंचित राहतील, ३२११ महिलांवरती अन्याय होईल.
मग त्याच्यावरती निर्णय झाला त्या बैठकीमध्ये की, येणाऱ्या बजेटमध्ये ३२११ महिलांना पहिली मशीन वाटप करा, त्याच्यानंतर दुसरे फॉर्म काढा. म्हणून ही खूप आनंदाची आणि खुशखबर महिलांना देऊ इच्छितो की, मुंबई शहरातील ज्या रिजेक्ट झालेल्या फॉर्म होत्या आणि ज्यांना मशीन मिळाल्या नव्हत्या, त्यांना पहिल्या ३२११ महिलांना हे फॉर्म ज्यांचे मंजूर झालेत त्यांना पहिल्या मशीन मिळतील. पुन्हा तुम्हाला फॉर्म भरायची गरज नाही. अशी माहिती भायखळाचे नगरसेवक रोहिदास लोखंडे यांनी दिली.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 9 JULY TO...
- 09 July, 2026
ADHARSH SWARAJ 2 JULY TO...
- 02 July, 2026
ADHARSH SWARAJ 25 JUNE...
- 25 June, 2026
ADHARSH SWARAJ 18 JUNE...
- 18 June, 2026
ADHARSH SWARAJ 4 JUNE TO...
- 04 June, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Karishma Sawant