या AI मुळे बँकिंग प्रणालीवर सायबर हल्ल्याचा धोका
या AI मुळे बँकिंग प्रणालीवर सायबर हल्ल्याचा धोका
नवी दिल्ली - अर्थमंत्री निर्मला सीतारामन बँकांच्या प्रमुखांसोबत आयोजित केलेल्या उच्चस्तरीय बैठकीत अँथ्रोपिकच्या ‘क्लॉड मिथॉस’ Claude Mythos AI मॉडेलमुळे बँकिंग क्षेत्राला होणाऱ्या संभाव्य धोक्यांवर चर्चा करण्यात आली. हे AI मॉडेल इतके प्रगत आहे की हॅकर्स त्याचा वापर दशकांपासूनच्या अज्ञात त्रुटी शोधून आर्थिक क्षेत्रावर सायबर हल्ले करण्यासाठी करू शकतात.
अर्थमंत्री सीतारामन यांनी बँकांना त्यांच्या IT प्रणाली सुरक्षित ठेवण्यासाठी आणि ग्राहकांच्या डेटाच्या संरक्षणासाठी आवश्यक पावले उचलण्याचे निर्देश दिले आहेत. अर्थ मंत्रालयाने सांगितले की, मिथॉसमुळे निर्माण होणारा धोका असा आहे, जो यापूर्वी कधीही पाहिला गेला नाही. यासाठी वित्तीय संस्था आणि बँकांमध्ये उत्तम समन्वय आणि उच्च स्तरावरील तयारीची आवश्यकता आहे.
अर्थ मंत्रालय आता एक अशी चौकट (फ्रेमवर्क) तयार करण्याची योजना आखत आहे, जी हॅकिंगच्या प्रयत्नांना ओळखू शकेल आणि त्यावर त्वरित कारवाई करू शकेल. बँकांना सल्ला देण्यात आला आहे की त्यांनी सायबर हल्ल्याची माहिती एकमेकांसोबत शेअर करण्यासाठी एक रिअल-टाइम इंटेलिजन्स शेअरिंग यंत्रणा (मेकॅनिझम) तयार करावी. यात इंडियन कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम (CERT-In) आणि इतर एजन्सीजचाही समावेश असेल.
काय आहे Claude Mythos
मिथॉस हे ॲन्थ्रोपिकचे सर्वात शक्तिशाली AI मॉडेल आहे. कंपनीच्या मते, मिथॉसने ऑपरेटिंग सिस्टम आणि ब्राउझरमधील दशकांपासूनच्या त्रुटी शोधून काढल्या आहेत, ज्या मानवांना दिसल्या नाहीत. ॲन्थ्रोपिकचे म्हणणे आहे की, याला सार्वजनिक करणे म्हणजे कोणाच्याही हातात प्रगत हॅकिंग टूल देण्यासारखे असेल.
ॲन्थ्रोपिकने याचा ॲक्सेस फक्त ॲमेझॉन, मायक्रोसॉफ्ट आणि गुगल सारख्या निवडक 40 कंपन्यांना दिला आहे. मात्र, अहवालानुसार, काही अनधिकृत वापरकर्त्यांनी याचा ॲक्सेस मिळवला आहे. यामुळे भीती आहे की ते सिस्टमच्या सुरक्षा त्रुटींचा फायदा घेऊ शकतात.
ॲन्थ्रोपिकने म्हटले आहे की, जर याला कोणत्याही नियंत्रणाशिवाय रिलीज केले गेले, तर अर्थव्यवस्था, सार्वजनिक सुरक्षा आणि राष्ट्रीय सुरक्षेसाठी याचे परिणाम खूप वाईट असू शकतात.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
24 SEPT TO 30 SEPT 2026...
- 24 September, 2026
ADHARSH SWARAJ 9 JULY TO...
- 09 July, 2026
ADHARSH SWARAJ 2 JULY TO...
- 02 July, 2026
ADHARSH SWARAJ 25 JUNE...
- 25 June, 2026
ADHARSH SWARAJ 18 JUNE...
- 18 June, 2026
आम्हाला फॉलो करा
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
सेलिब्रिटी बर्थडे
Navjot singh sidhu
- जन्मदिन
- October 20
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Karishma Sawant