FDA कडून रक्तपेढ्यांना या तपासण्या अनिवार्य
FDA कडून रक्तपेढ्यांना या तपासण्या अनिवार्य
मुंबई-: राज्यभर अन्नधान्य, खाद्यपदार्थ आणि उपाहारगृहांमधील अन्नाच्या गुणवत्तेवर लक्ष ठेवून कठोर कारवाईचा बडगा उचलणाऱ्या FDA ने आता राज्यातील रक्तपेढ्यांचीही छाननी सुरू केली आहे. FDA कडून आता रक्त पिशवीची एचआयव्ही, सिफिलिस, हिपॅटायटिस बी, हिपॅटायटिस सी तपासणी अनिवार्य करण्यात आले आहे तसेच स्वतंत्र क्वारंटाईन व्यवस्था, नियमित सेल्फ-ऑडिट करणे बंधनकारक करण्यात आले आहे. राज्यातील रक्तपेढ्यांनी नियमांचे उल्लंघन केले तर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिला आहे.
राज्यातील काही रक्तपेढ्या आणि रक्त साठवणूक केंद्रांकडून रक्त सुरक्षेसारख्या अत्यंत संवेदनशील विषयातही नियमांची पायमल्ली होत असल्याचे उघड झाल्यानंतर अन्न व औषध प्रशासनाने अखेर कठोर भूमिका घेतली आहे. राज्यातील सर्व परवानाधारक रक्त केंद्रे आणि रक्त साठवणूक केंद्रांसाठी प्रथमच सर्वसमावेशक ‘कॉम्प्लायन्स ऑर्डर’ जारी करण्यात आला असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या रक्तपेढ्यांवर कठोर कायदेशीर कारवाईचा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे.
सुरक्षित आणि गुणवत्तापूर्ण रक्त मिळणे हा प्रत्येक रुग्णाचा मूलभूत अधिकार आहे. त्यामुळे नियमांचे पालन न करणाऱ्या कोणत्याही रक्तकेंद्राची गय केली जाणार नाही. राज्यातील सर्व रक्तकेंद्रांनी तातडीने आपल्या कार्यपद्धतीचा आढावा घेऊन आवश्यक सुधारणा कराव्यात, अन्यथा कठोर कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल, असा स्पष्ट इशारा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिला
तपासण्यांमध्ये अनेक रक्तकेंद्रांमध्ये औषधे व प्रसाधने नियम, १९४५ मधील ‘शेड्यूल एफ’ अंतर्गत असलेल्या अनिवार्य अटींचे पालन होत नसल्याचे निदर्शनाला आल्याने एफडीएला हा निर्णय घ्यावा लागला. त्यामुळे रक्त संकलनापासून रक्तवितरणापर्यंत प्रत्येक टप्प्यावर एकसमान आणि कठोर नियम लागू करण्यात आले आहेत.
प्रत्येक रक्तपिशवीची एचआयव्ही, हिपॅटायटिस बी, हिपॅटायटिस सी, सिफिलिस आणि मलेरिया यांसाठी अनिवार्य तपासणी,
योग्य तापमानात रक्तसाठवण, स्वतंत्र क्वारंटाईन व्यवस्था, नियमित सेल्फ-ऑडिट, ई-रक्तकोश पोर्टलवर दररोज माहिती अद्ययावत करणे आणि
प्रशिक्षित मनुष्यबळाची उपलब्धता बंधनकारक करण्यात आली आहे.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 9 JULY TO...
- 09 July, 2026
ADHARSH SWARAJ 2 JULY TO...
- 02 July, 2026
ADHARSH SWARAJ 25 JUNE...
- 25 June, 2026
ADHARSH SWARAJ 18 JUNE...
- 18 June, 2026
ADHARSH SWARAJ 4 JUNE TO...
- 04 June, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Karishma Sawant