Gen-Z पर्यंत पोहोचण्यासाठी केंद्र सरकार आले Snapchat वर
Gen-Z पर्यंत पोहोचण्यासाठी केंद्र सरकार आले Snapchat वर
नवी दिल्ली-: जंतर मंतरवरील आंदोलनात Gen-Z चा उसळलेला रोष पाहून आता केंद्र सरकारने सावध भूमिका घेतली आहे. या पिढीला समजून घेण्यासाठी सरकार आता सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. विविध्य माध्यमातून सरकार नव्या पिढीपर्यंत पोहोचू पाहत आहे. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने जेन-झी ट्रेंडमध्ये लोकप्रिय सोशल नेटवर्किंग साईट स्नॅपचॅटवर उललब्धता दर्शवली आहे.
भारताचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता रणधीर जयस्वाल यांनी एक्सवर शेअर केलेल्या एका पोस्टमध्ये ही माहिती दिली आहे.जयस्वाल यांनी म्हटलंय की,आता आम्ही Snapchat वरही आहोत.खास गोष्टी,अपडेट्स,इंटरेस्टिंग कन्टेंट आणि अनेक विषयांसाठी आमच्या संपर्कात राहा. चला स्नॅप करूया. विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेअर करत विद्यार्थ्यांना संबोधित केलं होतं.मोदी यांनी मंत्र्यानाही सोशल मीडियावर सक्रीय राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 9 JULY TO...
- 09 July, 2026
ADHARSH SWARAJ 2 JULY TO...
- 02 July, 2026
ADHARSH SWARAJ 25 JUNE...
- 25 June, 2026
ADHARSH SWARAJ 18 JUNE...
- 18 June, 2026
ADHARSH SWARAJ 4 JUNE TO...
- 04 June, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
गुरुदत्त वाकदेकर