मुलांच्या सुरक्षेसाठी शाळेच्या बस बाबत सरकारचा नवीन नियम लागू
मुलांच्या सुरक्षेसाठी शाळेच्या बस बाबत सरकारचा नवीन नियम लागू
मुंबई-: विद्यार्थ्यांचा शालेय प्रवास अधिक सुरक्षित होण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र मोटार वाहन (शालेय बसचे नियमन) (पहिली सुधारणा) नियम 2026 अंतर्गत संपूर्ण राज्यासाठी एक सर्वसमावेशक नियमावली जाहीर करण्यात आली आहे. या नव्या नियमांमुळे राज्यातील शालेय बस आणि व्हॅनच्या भाड्यावर पहिल्यांदाच सरकारी नियंत्रण येणार आहे, तसेच वाहन चालकांसाठी कडक सुरक्षा मानके पाळणे बंधनकारक करण्यात आले आहे.
हे नवीन नियम २०११ च्या जुन्या शालेय वाहतूक नियमांमध्ये सुधारणा करून लागू करण्यात आले आहेत. शाळा आणि वाहतूकदारांना या नवीन नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी 3 महिन्यांची मुदत देण्यात आली आहे. शासनाने शालेय बसेसच्या वापराच्या वयोमर्यादेत बदल केला आहे. पूर्वी बसेस केवळ १५ वर्षांपर्यंत चालवण्याची परवानगी होती, ती आता वाढवून 20 वर्षे करण्यात आली आहे. मात्र, यासाठी वाहनाने फिटनेस, देखभाल आणि सुरक्षेचे सर्व निकष पूर्ण करणे आवश्यक राहील.नव्या नियमांनुसार आता शाळा आपल्या मनमानी पद्धतीने बसचे भाडे वाढवू शकणार नाहीत.
निश्चित भाडे रचना: प्रादेशिक परिवहन प्राधिकरण (RTA) आता अंतर आणि वाहनाचा एकूण खर्च लक्षात घेऊन शालेय बस, व्हॅन आणि शैक्षणिक संस्थांच्या वाहनांचे मूळ भाडे निश्चित करेल.
10 टक्क्यांची मर्यादा: कोणत्याही वाहतूकदाराला किंवा शाळेला मंजुरी मिळालेल्या अधिकृत भाड्यापेक्षा 10 टक्क्यांपेक्षा जास्त किंवा कमी भाडे आकारण्याची परवानगी नसेल. यामुळे संपूर्ण राज्यात भाड्यात एकसमानता येईल आणि फीवरून होणारे वाद थांबतील.
विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी प्रत्येक शालेय वाहनात खालील तांत्रिक गोष्टी बसवणे आता बंधनकारक करण्यात आले आहे:
१. लाईव्ह ट्रॅकिंग: जीपीएस (GPS) वर आधारित वाहनाचे थेट लोकेशन ट्रॅकिंग.
२. सीसीटीव्ही कॅमेरे: वाहनाच्या आत सीसीटीव्ही (CCTV) देखरेख यंत्रणा. पालकांसाठी आणि प्रशासनासाठी या सीसीटीव्हीचे फुटेज किमान 30 दिवसांपर्यंत सुरक्षित ठेवणे आवश्यक आहे.
३. पॅनिक बटन: संकटसमयी माहिती देण्यासाठी पॅनिक बटनसह व्हेईकल लोकेशन ट्रॅकिंग डिव्हाइस बसवावे लागेल.
४. डिजिटल हजेरी: मुले बसमध्ये कधी चढली आणि कधी उतरली, याची नोंद ठेवणारी डिजिटल हजेरी प्रणाली.
५. मोबाईल अॅप: पालकांना बसच्या हालचालींवर घरबसल्या लक्ष ठेवता यावे म्हणून मोबाईल अॅपची सुविधा देणे बंधनकारक असेल.
अत्यावश्यक सुरक्षा साधने आणि बाल सुरक्षा नियम
अपघात किंवा आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी वाहनांमध्ये खालील बदल करणे अनिवार्य आहे:
सीट बेल्ट: बस किंवा व्हॅनमधील प्रत्येक प्रवाशासाठी स्वतंत्र सीट बेल्ट असणे आवश्यक आहे.
अग्निशामक यंत्रणा: आग लागल्याची माहिती देणारी अलार्म सिस्टीम आणि अग्निशामक उपकरणे वाहनात असावीत.
महिला मदतनीस: इयत्ता 5 वी पर्यंतच्या लहान मुलांना नेणाऱ्या वाहनांमध्ये एक महिला कर्मचारी किंवा मदतनीस असणे सक्तीचे राहिले.
चालकांचे व्हेरिफिकेशन: सर्व चालकांची आणि मदतनीसांची पोलिसांकडून चारित्र्य पडताळणी आणि वैद्यकीय तपासणी केली जाईल.
दिव्यांग मुलांची सोय: विशेष गरजा असलेल्या आणि दिव्यांग मुलांसाठी वाहनांमध्ये विशेष सोयी-सुविधा उपलब्ध करून द्याव्या लागतील.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
24 SEPT TO 30 SEPT 2026...
- 24 September, 2026
ADHARSH SWARAJ 9 JULY TO...
- 09 July, 2026
ADHARSH SWARAJ 2 JULY TO...
- 02 July, 2026
ADHARSH SWARAJ 25 JUNE...
- 25 June, 2026
ADHARSH SWARAJ 18 JUNE...
- 18 June, 2026
आम्हाला फॉलो करा
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
सेलिब्रिटी बर्थडे
Navjot singh sidhu
- जन्मदिन
- October 20
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Mukesh S. Dhawade