रोहयो मंत्री भरत शेठ गोगावले यांच्या अध्यक्षतेखाली ३०० कोटी वृक्षारोपण मोहिमेच्या नियोजनाला वेग
रोहयो मंत्री भरत शेठ गोगावले यांच्या अध्यक्षतेखाली ३०० कोटी वृक्षारोपण मोहिमेच्या नियोजनाला वेग
मुंबई - राज्यात ३०० कोटी वृक्षारोपण मोहीम तसेच विविध हरित पायाभूत सुविधा उपक्रमांचे प्रभावी नियोजन आणि अंमलबजावणी करण्यासाठी आज विधान भवन येथे रोजगार हमी योजना, फलोत्पादन व खारभूमी विकास मंत्री मा. श्री. भरतशेठ गोगावले यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.
महसूल व वन विभागाच्या दि. ७ मे २०२६ रोजीच्या शासन निर्णयानुसार राज्यात ३०० कोटी वृक्षारोपण मोहीम आणि इतर हरित पायाभूत सुविधा उपक्रमांच्या नियोजन व अंमलबजावणीसाठी “हरित महाराष्ट्र आयोग” स्थापन करण्यास मान्यता देण्यात आली आहे. या महत्त्वाकांक्षी उपक्रमाच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक असलेल्या लँड बँकेबाबत MITRA संस्थेच्या अधिकाऱ्यांनी सविस्तर माहिती सादर केली.
राज्यात दि. १ जुलै २०२६ पासून विकसित भारत रोजगार व आजीविका हमी अभियान (VB-G RAM G) योजनेची अंमलबजावणी सुरू करण्यात आली असून, या माध्यमातून हरित महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण व पर्यावरण संवर्धनाचे उपक्रम राबविण्यात येणार आहेत. त्यानुसार उद्योग विभागामार्फत ३०० कोटी, वन विभागामार्फत १०० कोटी आणि रोजगार हमी योजनेअंतर्गत १०० कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट प्रस्तावित करण्यात आले आहे.
यावेळी एशियन डेव्हलपमेंट बँक (ADB) यांच्या सहाय्याने राज्यात बांबू विकास प्रकल्प राबविण्याबाबतही चर्चा करण्यात आली. या प्रकल्पासाठी स्वतंत्र लेखाशीर्ष निर्माण करण्याबाबत संबंधित विभागास सूचित करण्यात आले आहे.
महाराष्ट्राची अर्थव्यवस्था २०२८ पर्यंत १ ट्रिलियन डॉलरपर्यंत नेण्याच्या राज्य शासनाच्या उद्दिष्टाला अनुसरून आर्थिक सल्लागार परिषदेने तयार केलेल्या
आराखड्यानुसार MITRA (महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन) च्या माध्यमातून उद्योग विभाग, वन विभाग आणि VB-G RAM G अभियानाच्या सहकार्याने ADB च्या सहाय्याने बांबू विकास प्रकल्प राबविण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे.
यावेळी मंत्री भरतशेठ गोगावले यांनी हरित विकास, पर्यावरण संवर्धन आणि रोजगारनिर्मिती यांचा संगम साधणाऱ्या या उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने कार्य करण्याचे निर्देश दिले. राज्यात ३०० कोटी वृक्षारोपण मोहिमेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र पूर्णपणे सज्ज असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
सदर बैठकीस MITRA चे सहमुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अमन मित्तल, सहसचिव तथा मिशन महासंचालक श्री. अतुल कोदे, माजी महासंचालक श्री. नंदकुमार, सहसचिव MITRA श्री. प्रमोद शिंदे, विशेष कार्यकारी अधिकारी श्री. योगेश भुतडा तसेच संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 9 JULY TO...
- 09 July, 2026
ADHARSH SWARAJ 2 JULY TO...
- 02 July, 2026
ADHARSH SWARAJ 25 JUNE...
- 25 June, 2026
ADHARSH SWARAJ 18 JUNE...
- 18 June, 2026
ADHARSH SWARAJ 4 JUNE TO...
- 04 June, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Mukesh S. Dhawade