मानखुर्द येथील बॉम्बे सोप फॅक्टरीच्या जागेवरील १४०० अनधिकृत झोपड्यांचे निष्कासन
मानखुर्द येथील बॉम्बे सोप फॅक्टरीच्या जागेवरील १४०० अनधिकृत झोपड्यांचे निष्कासन
मुंबई- घाटकोपर-मानखुर्द जोड मार्गालगत असलेल्या मानखुर्द येथील बॉम्बे सोप फॅक्टरी (डब्बा कंपनी) या शासकीय जागेवरील १४०० अनधिकृत झोपड्यांचे आज (दिनांक ८ एप्रिल २०२६) निष्कासन करण्यात आले. बृहन्मुंबई महानगरपालिकेचे ‘एम पूर्व’ प्रशासकीय विभाग आणि मुंबई उपनगरे जिल्हाधिकारी कार्यालय यांनी संयुक्तपणे ही कारवाई केली.
महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ च्या कलम ५० अन्वये घाटकोपर-मानखुर्द जोड मार्गालगत असलेल्या मानखुर्द येथील बॉम्बे सोप फॅक्टरी (डब्बा कंपनी) या शासकीय जागेवरील झोपड्यांवर निष्कासनाची कारवाई करण्यासंदर्भात अपर जिल्हाधिकारी (अतिक्रमण निष्कासन) पूर्व उपनगरे यांनी निर्देशित केले होते.
त्यानुसार, महानगरपालिकेचे सह आयुक्त (परिमंडळ-५) श्री. देविदास क्षीरसागर, सहायक आयुक्त (एम पूर्व) श्री. उज्ज्वल इंगोले यांच्या नेतृत्वात बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ‘एम पूर्व’ प्रशासकीय विभागाने ही कारवाई केली. इमारत व कारखाना विभागातील सहायक कनिष्ठ आणि दुय्यम अभियंत्यांची या कारवाईसाठी नेमणूक करण्यात आली होती. तसेच, सुमारे २०० कामगारांसह ३ पोकलेन, ७ जेसीबी, १० डंपर, २ ड्रोन कॅमेरे आदी यंत्रसामग्री पुरविण्यात आली. यावेळी पुरेसा पोलीस बंदोबस्त तैनात होता.
‘एम पूर्व’ प्रशासकीय विभागातील घाटकोपर-मानखुर्द या जोड मार्गालगत असलेल्या मानखुर्द (ता. कुर्ला) येथील नगरभूमापन क्रमांक १/२ (पै) या मिळकतीवर बॉम्बे सोप फॅक्टरी (डब्बा कंपनी) हे सुमारे २२ एकर जमीन क्षेत्र असून त्यावर अनधिकृतपणे झोपड्या बांधण्यात आल्या होत्या.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
24 SEPT TO 30 SEPT 2026...
- 24 September, 2026
ADHARSH SWARAJ 9 JULY TO...
- 09 July, 2026
ADHARSH SWARAJ 2 JULY TO...
- 02 July, 2026
ADHARSH SWARAJ 25 JUNE...
- 25 June, 2026
ADHARSH SWARAJ 18 JUNE...
- 18 June, 2026
आम्हाला फॉलो करा
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
सेलिब्रिटी बर्थडे
Navjot singh sidhu
- जन्मदिन
- October 20
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Mukesh S. Dhawade