आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत चळवळीसाठी समर्पित राहणार : प्रा. जोगेंद्र कवाडे सर
आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत चळवळीसाठी समर्पित राहणार : प्रा. जोगेंद्र कवाडे सर
मुंबई - देशाला स्वातंत्र्य मिळून 77 वर्षे उलटली तरी लोकशाहीचा केंद्रबिंदू असलेला मोठा वर्ग जो महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेली चळवळ घेऊन चालत आहे आणि मी त्याच वर्गातील एक सामान्य कार्यकर्ता असे स्वताला समजतो. देशातील प्रत्येक घटकातील शेवटच्या व्यक्तीला समानतेचा अधिकार मिळवून देण्याचे मोलाचे कार्य संविधानाने केले आहे. त्याच संविधानाच्या चौकटीत राहुन मी आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत चळवळीसाठी समर्पित राहणार असे प्रतिपादन लॉंग मार्च प्रणेते व पीरिपाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. जोगेंद्र कवाडे सर यांनी केले आहे. मंगळवारी सायंकाळी नागपुरातील आनंद नगरातील पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या केंद्रिय कार्यालयात प्रा. जोगेंद्र कवाडे सर यांचा वाढदिवस संघर्ष दिन म्हणून साजरा करण्यात आले. भव्य सत्कार सोहळयात पीपल्स रिपब्लिकन पार्टी चे राष्ट्रीय कार्याध्यक्ष तसेच महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळाचे उपाध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) जयदीप भाई कवाडे यांच्या हस्ते प्रा. कवाडे सरांना शॉल व पुष्पहार देउन सत्कार करण्यात आले. याप्रसंगी सौ. प्रतिमाताई ज. कवाडे, महाराष्ट्र प्रदेश संघटक कपिल लिंगायत, प्रदेश उपाध्यक्ष मृणाल गोस्वामी, विदर्भ अध्यक्ष विजय पाटिल,शहर अध्यक्ष कैलाश बोम्बले, नागपुर ग्रामीण जिल्हाध्यक्ष नरेंद्र डोंगरे, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष सविता ताई नारनवरे, नागपुर शहर कार्याध्यक्ष संजय सूर्यवंशी यांच्यासह विदर्भ व जिल्हयातील कार्यकर्ते मोठया प्रमाणात उपस्थित होते.
याप्रसंगी कार्यकर्त्यांना संबोधित करताना प्रा. जोगेंद्र कवाडे सर म्हणाले की, प्रत्येक क्षण शोषित, वंचित व उपेक्षितांसाठी समर्पित करण्याचे आपले ध्येय असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. देशात जातीपातीचे राजकारण करून समाजात विश पसरविण्याचे काम विरोधकांकडून होत आहे. इतिहासाची मोडतोड करून नवा वाद उभाकरून दंगलीचे विष कालविण्याचे काम होत आहे. यामुळे देशाची सोहार्दतेला खिळ बसविण्याचे काम होत आहे. त्यामुळे मानवी मूल्याचे वाटोळे झाले आहे. ही समाज व्यवस्था बदलण्याचा आपला प्रयत्न आहे, त्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत माझा संघर्ष हा सुरू राहणार, असे प्रतिपादन लॉंग मार्च प्रणेते व पीरिपाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. जोगेंद्र कवाडे सर यांनी केले आहे.
नामांतर लढा अविरत संघर्षाचे प्रतिक
आज महाविकास आघाडीत असलेले कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने नेहमीच आंबेडकरी चळवळीला खिंडार पाडण्याचे काम केले. या दोन्ही पक्षा मुळेच आम्हाला सोळा वर्षांच्या प्रदीर्घ संघर्ष करावा लागला त्यानंतर मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतरणाची घोषणा करण्यात आली. अविरत संघर्षामुळेच विद्यापीठाच्या प्रवेश द्वारावर आपल्याला निळा टिळा लावता आला. तो आपल्या आयुष्यातील परमोच्च आनंदाचा क्षण होता. या आंदोलनात माझ्यासोबत भाजपचे गोपीनाथ मुंडे व गंगाधरराव फडणवीस हे देखील तुरुंगात गेले होते. त्यावेळी भाजपाला आंदोलन हे किती महत्त्वाचे आहे याची जाण होती. परंतु, खंत एव्हढीच की आपल्याला बाबासाहेबांच्या विचारांचे पक्ष चालविण्याचे ढोंग करणारे कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष आजही जातीपातीचे राजकारण करून समुदायाला भरकटविण्याचे काम करीत आहे. भीम सैनिकांचा संघर्ष करण्यासाठीच या दोन्ही पक्षांनी पक्ष व संघटनांना उपेक्षित ठेवण्याचे काम केले. परंतु, आता आंबेडकरवादी जनतेला यांच्या कारभाराची जाण आहे. त्यामुळेच गत निवडणुकीत महायुतीवर विश्वास प्रत्येक समाजाने ठेवला आणि पुन्हा सत्ता महायुतीला मिळाल्याचेही प्रा. जोगेंद्र कवाडे सर यावेळी म्हणाले.
विविध पक्षाचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी दिल्या शुभेच्छा
यावेळी पीपल्स रिपब्लिकन पार्टीसह विविध पक्षाचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी प्रा. कवाडे सरांना शुभेच्छा दिल्या. पीरिपातर्फे ‘संघर्ष दिना’चे औचित्य साधून पीपल्स रिपब्लिकन पार्टी, रिपब्लिकन युथ फोर्स, रमाई महिला ब्रिगेड, दलित मुक्ती सेना, राष्ट्रीय मजदूर सेना, राष्ट्रीय विद्यार्थी सेने तर्फे शहरातील विविध ठिकाणी सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विजय पाटिल, अजय चव्हाण, नरेंद्र डोंगरे, पलाश ठवरे, रत्नाकर मडके, अरुण वाहणे, सुनीताताई शेंडे, सुचिता कोटांगळे, संजय खांडेकर, प्रा. गोपीचंद ढोके, दिलीप पाटील, सोहेल खान, स्वप्नील महल्ले, प्रकाश मेश्राम, शैलेंद्र (बापू) भोंगाडे, मुरलीधर मूरारकर, हिमांशू मेंढे, संजय बडोदेकर, सुमित डोंगरे, भीमराव कळमकर, प्रज्योत कांबळे उपस्थित होते.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 19 MAR TO...
- 19 March, 2026
ADHARSH SWARAJ 12 MAR TO...
- 12 March, 2026
ADHARSH SWARAJ 5 FEB TO...
- 05 February, 2026
ADHARSH SWARAJ 29 JAN TO...
- 29 January, 2026
ADHARSH SWARAJ 15 JAN TO...
- 15 January, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Mukesh S. Dhawade