सेंटर ऑफ AI फॉर मॅन्युफॅक्चरिंग साठी कोलंबिया विद्यापीठ – IIT मुंबई यांच्यात करार
सेंटर ऑफ AI फॉर मॅन्युफॅक्चरिंग साठी कोलंबिया विद्यापीठ – IIT मुंबई यांच्यात करार
नवी दिल्ली - केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या वतीने आज भारत मंडपम येथे आयोजित ‘भारत बोधन एआय कॉन्क्लेव्ह 2026’च्या उद्घाटन सोहळ्यात IIT मुंबई आणि आणि कोलंबिया विद्यापीठ यांनी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या उपस्थितीत ‘कोलंबिया–आयआयटी बॉम्बे सेंटर ऑफ एआय फॉर मॅन्युफॅक्चरिंग’ स्थापन करण्यासाठी सामंजस्य करार (MoU) करण्यात आला.
हे केंद्र संयुक्त संशोधन आणि रूपांतरण (ट्रान्सलेशन) हब म्हणून कार्य करेल. वास्तविक उत्पादन क्षेत्रासाठी सक्षम, विस्तारक्षम आणि मानवकेंद्रित कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) प्रणाली विकसित करण्यावर त्याचा भर असेल, ज्यामुळे भारतातील नवोन्मेष परिसंस्था आणि उद्योग–शैक्षणिक सहकार्य अधिक मजबूत होईल. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी अनेक औद्योगिक भागीदारही प्रक्रियेत आहेत.
केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने आतापर्यंत चार वेगवेगळी एआय केंद्रे सुरू केली आहेत. ‘कोलंबिया–आयआयटी बॉम्बे सेंटर ऑफ एआय फॉर मॅन्युफॅक्चरिंग’ हे संयुक्त संशोधन आणि रूपांतरण (ट्रान्सलेशन) केंद्र असून, वास्तविक उत्पादन क्षेत्रासाठी सक्षम, विस्तारक्षम आणि मानवकेंद्रित एआय प्रणाली विकसित करण्याचा त्याचा उद्देश आहे. या केंद्रात सहभागी होण्यासाठी अनेक औद्योगिक भागीदार सध्या प्रक्रियेत आहेत.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 2 APR TO...
- 02 April, 2026
ADHARSH SWARAJ 26 MAR TO...
- 26 March, 2026
ADHARSH SWARAJ 19 MAR TO...
- 19 March, 2026
ADHARSH SWARAJ 12 MAR TO...
- 12 March, 2026
ADHARSH SWARAJ 5 FEB TO...
- 05 February, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Mukesh S. Dhawade