हृदय निरोगी ठेवण्यासाठी ‘हार्टस्ट्रॉंग’ पुस्तकातून मार्गदर्शन आणि उपाय
हृदय निरोगी ठेवण्यासाठी ‘हार्टस्ट्रॉंग’ पुस्तकातून मार्गदर्शन आणि उपाय
मुंबई - जगभरात हृदयरोग हे मृत्यूचे प्रमुख कारण ठरत असताना, प्रसिद्ध इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजिस्ट डॉ. कौशल छत्रपती यांनी “हार्टस्ट्रॉंग (Heartstrong)” हे नवे पुस्तक प्रकाशित केले आहे. सर्वसामान्य वाचकांसाठी तयार केलेले हे पुस्तक हृदयाच्या आरोग्याविषयी असलेले गैरसमज दूर करून योग्य माहितीच्या आधारे त्याबाबत जागरुकतेचे काम करते. आपत्कालीन स्थिती उद्भवण्यापूर्वी योग्य निर्णय घेता यावा, हा या पुस्तकाचा मुख्य उद्देश आहे.
आपल्या २१ वर्षांच्या वैद्यकीय कारकिर्दीत रुग्णांकडून वारंवार विचारले जाणारे प्रश्न म्हणजे हृदयाच्या वेदना जीवघेण्या ठरू शकतात का? मॅरेथॉनमध्ये धावणे हे सर्वांसाठी सुरक्षित आहे का? घरात पाळीव प्राणी असल्याने हृदयविकाराचा धोका कमी होतो का? दिवसाला एक-दोन सिगारेट ओढणे सुरक्षित आहे का? यासारखे अनेक प्रश्नांची उत्तरे डॉ. छत्रपती यांनी यामध्ये नोंदवून ठेवली आहेत आणि याच अनुभवांतून “हार्टस्ट्रॉन्ग” या पुस्तकाची निर्मिती झाली आहे.
एका घटनेचा उल्लेख करताना डॉ. छत्रपती सांगतात, ३९ वर्षीय एका रुग्णाला हृदयविकाराचा झटका आला होता. तातडीच्या अँजिओप्लास्टीमुळे त्याचे प्राण वाचले. मात्र त्याच्या पत्नीने मला प्रश्न विचारला की ‘तो इतका फिट होता, तरीही हार्ट अटॅक कसा आला?’ हा प्रश्न म्हणजे ऱ्हदयविकाराच्या झटक्याबाबत समाजात असलेल्या गैरसमजूतीचे उत्तम उदाहरण आहे. फिट दिसणे म्हणजे आरोग्यदायी असणे नव्हे. सिक्स-पॅक अॅब्स असूनही चुकीची जीवनशैली आरोग्यास घातक ठरू शकते.याच मानसिकतेत बदल घडवण्यासाठी हे पुस्तक लिहिले गेले आहे.
डॉ. छत्रपती यांनी ‘हार्टस्ट्रॉंग’ला “देवाने द्यायला विसरलेले हृदयाचे ओनर मॅन्युअल” असे संबोधले आहे. कार, मोबाईलच्या वापरासाठी जशी सूचना पुस्तिका मिळते तशी आयुष्यातील सर्वात महत्त्वाच्या अवयवासाठी म्हणजेच हृदयासाठी आवश्यक अशी मार्गदर्शक माहिती बहुतांश लोकांकडे नसते, याकडे हे पुस्तक वाचकांचे लक्ष वेधते.
हे पुस्तक वैद्यकीय तज्ज्ञांसाठी नसून सर्वसामान्य वाचकांसाठी सोप्या भाषेत, उदाहरणांसह आणि संवादात्मक शैलीत लिहिले गेले आहे. रक्तदाब, मधुमेह, लठ्ठपणा, कोलेस्ट्रॅाल, धूम्रपान, ताणतणाव, झोप, आहार, सीपीआरविषयी जागरूकता तसेच आधुनिक हृदयरोग उपचारांबाबतचे गैरसमज या सर्व विषयांवर पुस्तकात सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले आहे. विशेषतः हृदयविकाराच्या झटक्यावरील प्रकरण प्रत्येकाने वाचायलाच हवे, असे डॉ. छत्रपती आवर्जून सांगतात, कारण ते “खर्या अर्थाने जीव वाचवू शकते.”
जागतिक आरोग्य संघटनेनुसार (WHO) दरवर्षी जवळपास १.८ कोटी मृत्यू हे हृदयरोगामुळे होतात. भारतात बदलती जीवनशैली, ताणतणाव, मधुमेह, उच्च रक्तदाब, धूम्रपान आणि चुकीची माहिती यांमुळे हृदयरोगाचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर ‘हार्टस्ट्रॉंग’सारख्या पुस्तकाची अधिक गरज आहे असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले.
या पुस्तकाला नामवंत तज्ज्ञांकडूनही प्रशंसा मिळाली आहे. डॉ. फारोख ई. उदवाडिया यांनी हे पुस्तक “सर्वसामान्यांसाठी समजण्यास सोपे” असल्याचे म्हटले आहे, तर डॉ. अश्विन मेहता यांनी त्यातील सविस्तर आणि स्पष्ट मांडणीचे कौतुक केले आहे.
ट्रुथ अँड सोशल पब्लिकेशन यांनी प्रकाशित केलेले हे पुस्तक पहिल्या आवृत्तीत उपलब्ध असून त्याची किंमत ६९९ रुपये आहे. हृदयाचे आरोग्य जपण्यासाठी आणि योग्य वेळी योग्य निर्णय घेण्यासाठी ‘हार्टस्ट्रॉंग’ हे पुस्तक प्रत्येक कुटुंबासाठी नक्कीच उपयुक्त ठरेल.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 19 MAR TO...
- 19 March, 2026
ADHARSH SWARAJ 12 MAR TO...
- 12 March, 2026
ADHARSH SWARAJ 5 FEB TO...
- 05 February, 2026
ADHARSH SWARAJ 29 JAN TO...
- 29 January, 2026
ADHARSH SWARAJ 15 JAN TO...
- 15 January, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Mukesh S. Dhawade