नेदरलँडचा महापौर आईच्या शोधात नागपूरात दाखल
नेदरलँडचा महापौर आईच्या शोधात नागपूरात दाखल
नागपूर - नागपूरमध्ये अगदी एखाद्या चित्रपटातील वाटावी अशी घटना घडली आहे. चाळीस वर्षांपूर्वी अनाथ असल्यामुळे नागपूरमधुन नेदरलँड सारख्या समृद्ध देशात एक नवजात बालक दत्तक देण्यात आले होते. तिच व्यक्ती आज मोठे यश मिळवून नेदरलँडमध्ये महापौर झाले आहेत. तरीही त्यांना आपल्या मातेची आणि मातृभूमीची ओढ लागली होती. आपल्या आईच्या शोधात ते नागपूरात दाखल झाले आहेत.
नेदरलँड्स देशातील हिमस्टेड शहराचा महापौर फाल्गुन बिनेनडिक असे या व्यक्तीचे नाव असून तो आपल्या जन्मदात्री आईचा शोध घेण्यासाठी आणि आपले मूळ शोधण्यासाठी नागपूरात आला आहे. नागपुरात आल्यावर त्यांनी सर्वात आधी त्या मातेसमान व्यक्तीची भेट घेतली, ज्यांनी त्यांना नवजात असताना ममतेने सांभाळले होते. त्यावेळच्या अनाथाश्रमाच्या अधीक्षिका मंगला भुसारी यांची त्यांनी खास भेट घेतली. फाल्गुन महिन्यात जन्म झाला म्हणून मंगलाताईंनीच त्यांचे नाव ‘फाल्गुन’ ठेवले होते, ही आठवण त्यांनी या भेटीत उजाळली. ४१ वर्षांनंतर झालेल्या या भेटीने दोघांच्याही डोळ्यांत आनंदाश्रू तरळले.
फाल्गुन आजही आपल्या जन्मदात्री आईच्या शोधात आहेत. विशेष म्हणजे, ज्या आईने त्यांना तान्हे असताना सोडले, त्याबद्दल त्यांच्या मनात कोणताही राग किंवा द्वेष नाही. नागपूरचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या सूचनेनुसार जिल्हा महिला आणि बालविकास अधिकारी कार्यालय आता फाल्गुन यांच्या आईचा शोध घेणार आहेत.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 19 MAR TO...
- 19 March, 2026
ADHARSH SWARAJ 12 MAR TO...
- 12 March, 2026
ADHARSH SWARAJ 5 FEB TO...
- 05 February, 2026
ADHARSH SWARAJ 29 JAN TO...
- 29 January, 2026
ADHARSH SWARAJ 15 JAN TO...
- 15 January, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Mukesh S. Dhawade