उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांना मिळणार Z+ दर्जाची सुरक्षा
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांना मिळणार Z+ दर्जाची सुरक्षा
मुंबई - राज्याच्या नवनिर्वाचित उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांसंदर्भात गृहविभागाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. खासदार असताना सुनेत्रा पवारांना देण्यात आलेल्या ‘एक्स’ दर्जाच्या सुरक्षेऐवजी आता त्यांना ‘झेड प्लस’ दर्जाची सुरक्षा दिली जाणार आहे. सुनेत्रा पवार या आता राज्याच्या उपमुख्यमंत्री असल्याने त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. अजित पवार यांचं 28 जानेवारी रोजी बारामतीजवळ झालेल्या भीषण विमान अपघातामध्ये अकाली निधन झाल्यानंतर सुनेत्रा पवार यांना शनिवार, 31 जानेवारी रोजी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. अजित पवारांकडे असलेलं अर्थ खातं वगळता सुनेत्रा पवार यांच्याकडे राज्य सरकारमधील तीन खातीही सोपविण्यात आली आहेत. तसेच मंत्रालयात अजित पवार यांच्या वापरातील दालनेही सुनेत्रा पवारांच्या कार्यालयासाठी मंगळवारी प्रदान करण्यात आली. राज्याच्या राजकारणातील महत्त्वाच्या जिल्ह्यांमध्ये समावेश होणाऱ्या पुणे आणि बीडचे पालकमंत्रिपदही त्यांच्याकडे सोपवण्यात आलं आहे.
Z+ सुरक्षा म्हणजे काय ?
Z+ सुरक्षा ही SPG नंतर भारतातील दुसरी सर्वोच्चस्तरीय सुरक्षा व्यवस्था आहे. ती प्रामुख्याने व्हीव्हीआयपी, केंद्रीय मंत्री, मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री किंवा अत्यंत धोका असलेल्या व्यक्तींना दिली जाते.
Z+ सुरक्षेमध्ये तब्बल 36 ते 55 जणांचा सुरक्षा ताफा 24 तास सोबत असतो. उच्च स्तरावरील धोका असलेल्या नेत्यांना ही सुरक्षा दिली जाते. या सुरक्षा कड्यामध्ये एनएसजी/सीआरपीएफ कमांडोबरोबरच बुलेटप्रूफ वाहने पुरवली जातात.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 2 APR TO...
- 02 April, 2026
ADHARSH SWARAJ 26 MAR TO...
- 26 March, 2026
ADHARSH SWARAJ 19 MAR TO...
- 19 March, 2026
ADHARSH SWARAJ 12 MAR TO...
- 12 March, 2026
ADHARSH SWARAJ 5 FEB TO...
- 05 February, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Mukesh S. Dhawade