मुंबईत धावणार 18 डब्ब्यांची लोकल
मुंबईत धावणार 18 डब्ब्यांची लोकल
मुंबई - मुंबईत लोकल ट्रेन मधील गर्दीचे नियोजन करण्यासाठी आता १८ डब्यांच्या लोकल सुरु करण्याची तयारी रेल्वे प्रशासनाने सुरू केली आहे. १८ डब्ब्यांच्या लोकल ट्रेन सुरू करण्याच्या उद्देशाने रेल्वेकडून महत्त्वाचं पाऊल टाकलं जात आहे. पश्चिम रेल्वेने जानेवारीमध्ये विरार ते डहाणू रोड सेक्शनवरील १८ डब्यांच्या ईएमयू रॅकसाठी महत्त्वाच्या आपत्कालीन ब्रेकिंग डिस्टन्स (ईबीडी) आणि कपलर फोर्स चाचण्यांचं नियोजन केलं आहे. दरम्यान याआधी वाढत्या गर्दीवर उपाय म्हणून १८ डब्ब्यांच्या लोकल ट्रेन सुरू करण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानंतर आता १८ डब्ब्यांच्या लोकलसाठी चाचणी केली जाणार आहे.
जानेवारीच्या १४ आणि १५ तारखेला १८ डब्ब्यांच्या लोकलची चाचणी केली जाणार आहे. या नियोजित चाचण्यांमध्ये १८ डब्ब्यांच्या दोन वेगवेगळ्या गोष्टींचं मूल्यांकन केलं जाईल. पहिल्या फॉर्मेशनमध्ये बॉम्बार्डियर-क्लास रॅक ज्यांची चाचणी ११० किमी प्रतितास वेगाने करण्याचा प्रस्ताव आहे. तर दुसऱ्या फॉर्मेशनमध्ये मेधा इलेक्ट्रिकल्स रॅक याची चाचणी १०५ किमी प्रतितास वेगाने करण्याचा प्रस्ताव आहे.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 9 JULY TO...
- 09 July, 2026
ADHARSH SWARAJ 2 JULY TO...
- 02 July, 2026
ADHARSH SWARAJ 25 JUNE...
- 25 June, 2026
ADHARSH SWARAJ 18 JUNE...
- 18 June, 2026
ADHARSH SWARAJ 4 JUNE TO...
- 04 June, 2026
आम्हाला फॉलो करा
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
भावपूर्ण श्रद्धांजलि
K. Krishnan
- श्रद्धांजलि
- June 14
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Mukesh S. Dhawade