न्यायप्रविष्ट कामगारांना लाडपागे समितीच्या शिफारसी लागू करण्यासाठी आझाद मैदान येथे ‘संयुक्त एल्गार मोर्चा’ !
न्यायप्रविष्ट कामगारांना लाडपागे समितीच्या शिफारसी लागू करण्यासाठी आझाद मैदान येथे ‘संयुक्त एल्गार मोर्चा’ !
मुंबई-:बृहन्मुंबई महानगरपालिका आणि म.न.पा. कामगार संघटना संघर्ष समिती यांच्यामध्ये उभयपक्षी दि. २८ जुलै २०२५ रोजी कायदेशीर लेखी करार करण्यात आलेला आहे. सदर करारामध्ये मुद्दा क्र. १ ते ९ नुसार दोन्ही पक्षांना मान्य असलेल्या बाबींबाबत अद्याप एक वर्षाहून अधिक कालावधी होऊनही अद्याप कराराची योग्य प्रकारे अंमलबजावणी करण्याबाबत म.न.पा. प्रशासन टाळटाळ करीत असल्यामुळे घन कचरा व्यवस्थापन खात्यातील कामगार, कर्मचाऱ्यांमध्ये संभ्रमाचे व तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झालेले आहे.
त्याविरोधात आज आझाद मैदान येथे कामगारांनी जोरदार आंदोलन केले.
म.न.पा. प्रशासन आणि संघर्ष समितीच्या नेत्यांसोबत सर्वांच्या सहमतीने उभयपक्षी झालेल्या करारात महाराष्ट्र शासनाने प्रसिध्द केलेला शासन निर्णय क्र. सफाई-२०१८/प्र.क्र.४६/सआक, दिनांक २४-०२-२०२३ ची तंतोतंत अंमलबजावणी बृहन्मुंबई महानगरपालिकेत करण्याबाबत प्रशासनाने मान्य केले होते. त्याप्रमाणे घाणीशी संबंधित सर्व विभाग/ खात्यातील कामगार, कर्मचाऱ्यांना लाडपागे समितीच्या शिफारसी लागू करून वारसाहक्काने नोकरी देण्यात यावी अशी मागणी संघटनेच्यावतीने करण्यात आलेली आहे. याबाबत प्रशासनाने फक्त संयुक्त कमिटी स्थापन करून दोन मिटींग घेण्यात आल्या. परंतु मिटींगमध्ये निर्णय घेऊनही अमंलबजावणी करण्याच्या अनुषंगाने म.न.पा. प्रशासनाने कोणताही ठोस निर्णय घेतलेला नसल्यामुळे संबंधित विभागातील कर्मचाऱ्यामध्ये तीव्र असंतोष व नाराजी पसरलेली आहे.
तसेच दि. २८ जुलै २०२५ रोजी झालेल्या कराराप्रमाणे सर्व न्यायप्रविष्ट तथाकथित कंत्राटी कामगारांना महापालिकेच्या सेवेत कायमस्वरूपी सामावून घेण्याबाबत लेखी करार करण्यात आलेला असतानाही म.न.पा. प्रशासनाने दि. १०/०७/२०२६ रोजी सह.प्र.क.अ./२३४१/घ.क.व्य. नुसार प्रसूत करण्यात आलेल्या परिपत्रकात असलेली प्रमाणित कार्यपध्दती (SOP) मध्ये अनेक अन्यायकारक अटी व शर्तीचा समावेश आहे. त्यामुळे तथाकथित न्यायप्रविष्ट कंत्राटी कामगारांमध्ये संभ्रमाचे व असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे.
सर्व तथाकथित न्यायप्रविष्ट कंत्राटी कामगारांना सेवेत रुजू झालेल्या दिवसांपासून कायम करून त्यांना संपूर्ण सेवा-सवलती व सेवाविषयक लाभदेण्यात यावेत तथाकथित न्यायप्रविष्ट कंत्राटी कामगारांना कायम करण्यासाठी प्रशासनाने पारित केलेल्या प्रमाणित कार्यपध्दती (SOP) मधील त्रुटी व अन्यायकारक तरतुदी दूर करून, सर्व न्यायप्रविष्ट तथाकथित कंत्राटी कामगारांना कायम करण्यासाठी नवीन व सर्वसमावेश प्रमाणित कार्यपध्दती (SOP) तयार करण्यात यावी. दि. २४ फेब्रुवारी २०२३ च्या शासन निर्णयाच्या तरतुदीनुसार सर्व न्यायप्रविष्ट कंत्राटी कामगारांना लाड-पागे समितीच्या शिफारशी व निकषांनुसार वारसाहक्क पी.टी. (नोकरी) प्रकरणे लागू करण्यात यावीत. सेवेदरम्यान मृत्यू झालेल्या सर्व न्यायप्रविष्ट कंत्राटी कामगारांच्या वारसांना पी.टी. केस अन्वये महापालिकेच्या सेवेत सामावून घेण्यात यावे. अशी मागणी म्युनिसिपल मजदूर युनियनचे अध्यक्ष श्री. अशोक जाधव, सरचिटणीस श्री. वामन कविस्कर, कार्याध्यक्ष श्री. यशवंतराव देसाई तसेच कचरा वाहतूक श्रमिक संघ आणि महाराष्ट्र म्युनिसिपल कामगार युनियनचे अध्यक्ष श्री. दिपक भालेराव, सरचिटणीस श्री. मिलिंद रानडे यांनी केली.
म.न.पा. प्रशासन आणि म.न.पा. कामगार संघटना संघर्ष समिती यांच्यासमवेत दि. २८ जुलै २०२५ रोजी झालेल्या उभयपक्षी करण्यात आलेल्या लेखी कराराची अंमलबजावणी करण्यास होत असलेला विलंब व तथाकथीत कंत्राटी कामगारांवर अन्याय करणाऱ्या अटी व शर्तीचा समावेश असलेली प्रमाणित कार्यपध्दती (SOP) पुर्नविचार करून सुधारीत प्रमाणित कार्यपध्दती (SOP) पारीत करण्याबाबत तसेच दि. २४-०२-२०२३ रोजीच्या शासन निर्णयाची तंतोतंत अंमलबजावणी करण्यासाठी आझाद मैदान येथे सर्व संबंधित कामगार जमून म.न.पा. चे महापालिका अतिरिक्त
आयुक्त बिपीन शर्मा यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले.यावर शर्मा यांनी आपल्या मागण्या पूर्ण करू असे समाधानकारक आश्वासन दिले.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 9 JULY TO...
- 09 July, 2026
ADHARSH SWARAJ 2 JULY TO...
- 02 July, 2026
ADHARSH SWARAJ 25 JUNE...
- 25 June, 2026
ADHARSH SWARAJ 18 JUNE...
- 18 June, 2026
ADHARSH SWARAJ 4 JUNE TO...
- 04 June, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Karishma Sawant