पॅकेज्ड फूडवर वॉर्निंग लेबल लावा : SC चा अंतिम इशारा
पॅकेज्ड फूडवर वॉर्निंग लेबल लावा : SC चा अंतिम इशारा
नवी दिल्ली-: सर्वोच्च न्यायालयाने आज पॅकेज्ड फूड उत्पादनांच्या वॉर्निंग लेबलवर केंद्र सरकार आणि अन्न सुरक्षा प्राधिकरण (FSSAI) यांना अंतिम इशारा दिला आहे. न्यायालयाने म्हटले आहे की, नमकीन, बिस्किट आणि चिप्सच्या पाकिटांवर जास्त साखर-मीठ आणि फॅटची चेतावणी देणारे वॉर्निंग लेबल लावण्याबाबत सरकार निर्णय घेऊ शकत नसेल, तर आम्ही आदेश जारी करू.
न्यायालयाने केंद्र सरकारला सांगितले-
यापूर्वीही तुम्हाला कठोर पोषणविषयक वॉर्निंगबाबत निर्देश दिले होते, मग टाळाटाळ का? आम्ही जे सांगितले आहे, ते तुम्हाला करायला हवे, तुमच्यावर कॉर्पोरेट घराण्यांचा दबाव आहे का?
सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की, आम्ही जनतेच्या हितासाठी काम करत आहोत, स्वतःसाठी नाही. तुम्ही आतापर्यंत काय केले? 6 महिन्यांपूर्वीही सर्वोच्च न्यायालयाने सरकार आणि FSSAI ला पॅकेज्ड फूडवर वॉर्निंग लेबल लावण्यावर विचार करण्यास सांगितले होते.
FSSAI ने कोर्टात सांगितले की, फूड इंडस्ट्री पॅकेटच्या समोरच्या भागावर वॉर्निंग लेबल लावण्याच्या विरोधात आहे. या पर्यायाच्या रूपात, FSSAI ने एका न्यूट्रिशन टेबलमध्ये एडेड शुगर, सॅचुरेटेड फॅट आणि दिवसाला किती मीठ घ्यावे हे दर्शवण्याचा सल्ला दिला आहे. कंपन्यांचे मत आहे की, पॅकेटच्या समोर लाल चेतावणीच्या खुणांमुळे त्यांच्या व्यवसायावर प्रतिकूल परिणाम होईल.
न्यायालयाने सरकारचा हा युक्तिवाद फेटाळून लावला. सर्वोच्च न्यायालयाने प्रश्न विचारला- ‘भारताने नेहमीच एक अविकसित देश राहिले पाहिजे का?’ न्यायालयाने विचारले की, सरकारला आपल्या नागरिकांचे आणि मुलांचे आरोग्य सुनिश्चित करायचे नाही का? खंडपीठाने म्हटले की, उत्पादकांना हे आवडले नाही तरी, ग्राहकाला आपण काय खात आहोत हे जाणून घेण्याचा पूर्ण अधिकार आहे.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 9 JULY TO...
- 09 July, 2026
ADHARSH SWARAJ 2 JULY TO...
- 02 July, 2026
ADHARSH SWARAJ 25 JUNE...
- 25 June, 2026
ADHARSH SWARAJ 18 JUNE...
- 18 June, 2026
ADHARSH SWARAJ 4 JUNE TO...
- 04 June, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
गुरुदत्त वाकदेकर