ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते कृष्णकांत कांदळकर यांचे निधन; मरणोत्तर देहदान
मुंबई : चाफवडे, ता. आजरा, जिल्हा कोल्हापूर येथील सुपुत्र आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते कृष्णकांत ल. कांदळकर यांचे वयाच्या ९१व्या वर्षी हृदयविकाराने दिनांक ९ ऑगस्ट २०२६ रोजी मुंबई येथे दुःखद निधन झाले. सुमारे वर्षभरापासून ते मृत्यूशी झुंज देत होते. व्होकार्ड हॉस्पिटल, सेव्हनहिल हॉस्पिटल आणि रहेजा हॉस्पिटल येथे त्यांच्यावर उपचार झाले. उपचार थांबविण्यात आल्यानंतर नालासोपारा येथील कळंब गणपती मंदिर व स्वामी समर्थ मठाशेजारील यशवंत वृद्धाश्रम येथे त्यांची देवाज्ञा झाली.
मृत्यूनंतरही सामाजिक बांधिलकी जपताना कृष्णकांत कांदळकर यांनी नायर हॉस्पिटलमध्ये मरणोत्तर देहदान केले. आजरा अर्बन बँक, आजरा, मुंबईचे ते माजी संचालक व चेअरमन होते. जनता एज्युकेशन सोसायटीचे माजी संचालक तसेच अण्णा भाऊ आजरा तालुका सहकारी सुतगिरणीचे माजी संचालक म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली. माजी कार्यकारी दंडाधिकारी म्हणूनही त्यांनी काम केले.
ते माजी सैनिक होते. सेंट्रल गव्हर्नमेंट अकाउंट ऑडिटर डिपार्टमेंट, मुंबई, आजरा, कोल्हापूर येथे त्यांनी जबाबदारी पार पाडली. चाफवडे गावाच्या विकासकामांत त्यांचे मोठे योगदान होते. आजरा ग्रामीण विकासाच्या विविध कामांतही त्यांनी सातत्याने सहभाग घेतला. गाव आणि परिसराच्या विकासासाठी त्यांनी दीर्घकाळ कार्य केले.
कृष्णकांत कांदळकर हे २८बी, २८०१, अभ्युदयनगर सुरुची को-ऑप. सोसायटी येथे राहत होते. अभ्युदयनगर काळाचौकी गणेशोत्सव मंडळाचे ते सरचिटणीस होते. तसेच अभ्युदयनगर ज्येष्ठ नागरिक संघाचे सरचिटणीस व विश्वस्त म्हणून त्यांनी काम केले. समाजातील जातिभेद बाजूला ठेवून त्यांनी विविध विचारांच्या नेत्यांसोबत सामाजिक कार्य केले. बाळासाहेब ठाकरे यांच्यासह शिवसेना नेते, काँग्रेसचे नेते तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्री व नेत्यांसोबत त्यांनी सामाजिक कार्यात सहभाग घेतला.
कृष्णकांत कांदळकर यांच्या पश्चात मोठा परिवार आहे. त्यांच्या निधनाने चाफवडे गावाने सामाजिक, प्रशासकीय आणि विविध क्षेत्रांत कार्य करणारे ज्येष्ठ व्यक्तिमत्त्व गमावले आहे. चाफवडे गावाच्या तसेच आजरा ग्रामीण विकासातील त्यांचे योगदान दीर्घकाळ स्मरणात राहील. मरणोत्तर देहदानातून त्यांनी सामाजिक बांधिलकीचा आदर्श निर्माण केला. त्यांच्या कार्याचा आणि योगदानाचा ठसा सामाजिक क्षेत्रात कायम स्मरणात राहील.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
24 SEPT TO 30 SEPT 2026...
- 24 September, 2026
ADHARSH SWARAJ 9 JULY TO...
- 09 July, 2026
ADHARSH SWARAJ 2 JULY TO...
- 02 July, 2026
ADHARSH SWARAJ 25 JUNE...
- 25 June, 2026
ADHARSH SWARAJ 18 JUNE...
- 18 June, 2026
आम्हाला फॉलो करा
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
सेलिब्रिटी बर्थडे
Navjot singh sidhu
- जन्मदिन
- October 20
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Karishma Sawant