हिंदी भाषिक गिरवू लागले मराठीचे धडे ; रिक्षाचालकांसाठी स्तुत्य उपक्रम
हिंदी भाषिक गिरवू लागले मराठीचे धडे ; रिक्षाचालकांसाठी स्तुत्य उपक्रम
मुंबई-:परप्रांतातून येऊन मुंबईत रिक्षा व्यवसायाच्या माध्यमातून उपजीविका करणाऱ्या हिंदी भाषिक बांधवांना स्थानिक मराठी भाषेचे ज्ञान व्हावे आणि प्रवाशांशी संवाद साधणे अधिक सोपे जावे, या उद्देशाने दिंडोशी मध्ये राहणाऱ्या हिंदी भाषिक रिक्षाचालकांसाठी विशेष ‘मराठी भाषा वर्गां’चा शुभारंभ करण्यात आला आहे. शिवसेना नेते आमदार सुनिल प्रभू यांच्या विशेष पुढाकारातून हा स्तुत्य उपक्रम राबविण्यात येत आहे.
रिक्षाचालकांना अत्यंत सोप्या आणि व्यावहारिक पद्धतीने मराठी भाषा शिकविता यावी, यासाठी शैलेश पांडे यांच्या ‘स्वस्तिक (फ्रेंड्स ऑफ एज्युकेशन)’ या संस्थेकडे या भाषा वर्गांचे नियोजन आणि अध्यापनाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
“परिसरात राहणाऱ्या आणि व्यवसाय करणाऱ्या प्रत्येकाने स्थानिक मराठी भाषेचा आदर केला पाहिजे आणि ती आत्मसात केली पाहिजे. रिक्षाचालकांचा दररोज हजारो मराठी प्रवाशांशी संपर्क येतो. भाषेच्या अडचणीमुळे प्रवाशांशी होणारे गैरसमज टाळले जावेत, संवाद अधिक सौहार्दाचा व्हावा आणि रिक्षाचालकांनाही व्यवसायात मदत व्हावी, या हेतूने आम्ही हे वर्ग सुरू केले आहेत,” अशी माहिती शिवसेना नेते आमदार सुनिल प्रभू यांनी दिली.
या वर्गांमध्ये दैनंदिन व्यवहारातील शब्द, नम्र संभाषण, प्रवाशांशी बोलायचे छोटे-छोटे संवाद आणि वाहतूक नियमावली याबाबतचे प्रात्यक्षिक प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या उपक्रमाचे दिंडोशीतील नागरिक, प्रवासी आणि हिंदी भाषिक रिक्षाचालक संघटनांकडून तोंडभरून कौतुक करण्यात येत आहे.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
24 SEPT TO 30 SEPT 2026...
- 24 September, 2026
ADHARSH SWARAJ 9 JULY TO...
- 09 July, 2026
ADHARSH SWARAJ 2 JULY TO...
- 02 July, 2026
ADHARSH SWARAJ 25 JUNE...
- 25 June, 2026
ADHARSH SWARAJ 18 JUNE...
- 18 June, 2026
आम्हाला फॉलो करा
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
सेलिब्रिटी बर्थडे
Navjot singh sidhu
- जन्मदिन
- October 20
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Karishma Sawant