भारतीय तरुणाने बनवली हवेत उडणारी Electric Car
भारतीय तरुणाने बनवली हवेत उडणारी Electric Car
डेहराडून- : डोंगराळ भागातील प्रवासाची अडचण दूर करण्यासाठी उत्तराखंडमधील एका तरुणाने हवेत उडणारी ‘इलेक्ट्रिक कार’ तयार केली आहे. अल्मोडा येथील रहिवासी संशोधक रवी टमटा यांनी डोंगराळ भागातील वाहतुकीचा वेळ वाचवण्यासाठी Hapida Skynex या उडणाऱ्या इलेक्ट्रिक कारचा यशस्वी प्रयोग केला आहे. ड्रोन तंत्रज्ञानावर आधारित असलेल्या या वाहनामुळे रस्त्याने लागणारा दीड तासाचा प्रवास अवघ्या १५ मिनिटांत पूर्ण होऊ शकतो. सध्या ही चाचणी प्राथमिक टप्प्यात असली, तरी भविष्यात दुर्गम भागातील प्रवासाचे चित्र बदलण्यासाठी ही एक मोठी क्रांती मानली जात आहे. या हवेत उडणाऱ्या वाहनाची मोकळ्या मैदानात यशस्वी चाचणी घेतली असून, याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे
विशेष म्हणजे, चाचणीदरम्यान वाहनाला कोणतीही सुरक्षा दोरी बांधण्यात आलेली नव्हती. वाहनाने जमिनीवरून सुरक्षित उड्डाण केले, हवेत काही वेळ स्थिर राहिले, मैदानाभोवती एक छोटा फेरा मारला आणि पुन्हा अत्यंत सुरक्षितपणे जमिनीवर उतरले. हे संपूर्ण वाहन सुधारित ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर करून आणि विजेवर चालणारे बनवण्यात आले आहे.
रवी टमटा यांच्या हपिडा स्काय या स्टार्टअप कंपनीने या वाहनाला ‘हपिडा स्कायनेक्स’ असे नाव दिले आहे. ही उडणारी कार पूर्णपणे बॅटरीवर चालते. हे वाहन अजून संशोधनाच्या टप्प्यात असल्यामुळे यात वापरण्यात आलेली बॅटरी क्षमता, वाहनाची एकूण वजन वाहून नेण्याची क्षमता, चार्जिंगचा वेळ किंवा उड्डाणाचा जास्तीत जास्त कालावधी याबाबतची तांत्रिक माहिती कंपनीने अजून जाहीर केलेली नाही. एका माणसाला सुरक्षितपणे हवेत वाहून नेता यावे यासाठी या टीमने ड्रोन तंत्रज्ञानात अनेक महत्त्वाचे बदल केले आहेत.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 9 JULY TO...
- 09 July, 2026
ADHARSH SWARAJ 2 JULY TO...
- 02 July, 2026
ADHARSH SWARAJ 25 JUNE...
- 25 June, 2026
ADHARSH SWARAJ 18 JUNE...
- 18 June, 2026
ADHARSH SWARAJ 4 JUNE TO...
- 04 June, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Karishma Sawant