काळाचौकीचा राजा’ची दमदार सलामी; सरावाच्या जागेवरच लावले पहिले कडक ८ थर!
न्यू परशुराम क्रीडा मंडळ गोविंदा पथकाचा यंदाचा थरार; मेहनत, जिद्द आणि सामाजिक बांधिलकीचा अनोखा संगम
मुंबई, काळाचौकी : गोविंदा पथकांच्या थरारासाठी ओळखल्या जाणाऱ्या लालबाग-काळाचौकी-परळ विभागात ‘न्यू परशुराम क्रीडा मंडळ गोविंदा पथक (काळाचौकीचा राजा)’ यांनी २०२६ च्या गोविंदा उत्सवाची दमदार सुरुवात करत विभागातील पहिले कडक ८ थर लावण्याचा मान मिळवला आहे. विशेष म्हणजे, मंडळाच्या ज्या ठिकाणी गेल्या महिनाभरापासून सराव सुरू होता, त्याच जागेवर या गोविंदा पथकाने पहिल्यांदाच ८ थरांची यशस्वी सलामी दिली.
या पथकासाठी गोविंदा हा केवळ उत्सव नसून जिव्हाळ्याचा आणि अभिमानाचा विषय आहे. दिवसभर आपापल्या कामधंद्यात व्यस्त राहूनही मंडळातील तरुण गेल्या महिनाभरापासून नियमित सराव करत होते. मेहनत, शिस्त, एकजूट आणि जिद्दीच्या जोरावर त्यांनी आपल्या मनातील पहिले स्वप्न आज साकार केले.
‘सरावाच्या जागेवर पहिला ८ थर’ हा क्षण पथकातील प्रत्येक गोविंदासाठी भावनिक आणि अभिमानाचा ठरला. अनेक दिवसांची मेहनत, घाम आणि एकमेकांवरील विश्वास याचे फलित म्हणून हा थर उभा राहिला.
न्यू परशुराम क्रीडा मंडळ गेल्या अनेक वर्षांपासून गोविंदा उत्सवासोबतच सामाजिक कार्यातही सक्रिय असून गरजू व गोरगरीब नागरिकांना मदतीचा हात देण्याचे काम सातत्याने करत आहे. त्यामुळे या मंडळाची ओळख केवळ गोविंदा पथक म्हणून नव्हे, तर सामाजिक बांधिलकी जपणारे युवा मंडळ म्हणूनही निर्माण झाली आहे.
यंदाच्या गोविंदा उत्सवात ८ थरांची ही पहिली सलामी म्हणजे पुढील विक्रमांसाठीची नांदी मानली जात असून, ‘काळाचौकीचा राजा’चा थर यंदा आणखी उंच जाणार, असा विश्वास गोविंदा प्रेमींमधून व्यक्त होत आहे.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 9 JULY TO...
- 09 July, 2026
ADHARSH SWARAJ 2 JULY TO...
- 02 July, 2026
ADHARSH SWARAJ 25 JUNE...
- 25 June, 2026
ADHARSH SWARAJ 18 JUNE...
- 18 June, 2026
ADHARSH SWARAJ 4 JUNE TO...
- 04 June, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Karishma Sawant