‘ऑरेंज कॅप’च्या अनोख्या संकल्पनेतून कर्मचाऱ्यांमध्ये नेतृत्वगुणांना चालना
परळ येथील ‘केऔस कॅफे’ची कौतुकास्पद उपक्रमशीलता; रमेश जैन यांची अभिनव संकल्पना
मुंबई, परळ :परिसरातील कुटुंबीयांच्या विरंगुळ्याचे, गप्पांचे आणि आनंदाचे हक्काचे ठिकाण म्हणून ओळख निर्माण करणाऱ्या ‘केऔस कॅफे’ने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी राबविलेली एक अनोखी संकल्पना सध्या विशेष कौतुकाचा विषय ठरत आहे.
कॅफेमध्ये दर महिन्याला उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या एका कर्मचाऱ्याची ‘लीडर ऑफ द मंथ’ म्हणून निवड केली जाते. या कर्मचाऱ्याला सन्मानाची ‘ऑरेंज कॅप’ प्रदान केली जाते. त्यानंतर पुढील महिन्यात त्याच्यावर कॅफेच्या दैनंदिन व्यवस्थापनाची आणि मॉनिटरिंगची जबाबदारी सोपविली जाते.
या उपक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे कॅफेमधील प्रत्येक कर्मचाऱ्याला नेतृत्वाची संधी मिळते. त्यामुळे कर्मचारी केवळ आपले काम करण्यापुरते मर्यादित न राहता संपूर्ण कॅफेची जबाबदारी, ग्राहकांशी संवाद, व्यवस्थापन आणि टीमवर्क यांचा अनुभव घेतात. परिणामी त्यांच्या आत्मविश्वासात वाढ होऊन नेतृत्वगुण विकसित होण्यास मदत होते.
या अभिनव संकल्पनेमागे रमेश जैन यांची विचारसरणी असून, ‘काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला नेतृत्वाची संधी मिळाली पाहिजे’ हा त्यामागचा सकारात्मक दृष्टिकोन आहे. कर्मचाऱ्यांच्या कामाचे कौतुक करत त्यांना जबाबदारी देण्याचा हा उपक्रम निश्चितच इतर व्यावसायिकांसाठीही प्रेरणादायी ठरू शकतो.
परळ येथील या कॅफेमध्ये केवळ खाद्यपदार्थांचा आस्वाद घेण्यासाठीच नव्हे, तर अनेक कुटुंबे आपला आनंद, विरंगुळा, गप्पागोष्टी आणि आयुष्यातील सुख-दुःखाचे क्षण एकमेकांसोबत शेअर करण्यासाठी आवर्जून येतात. त्यामुळे कॅफे हे केवळ व्यवसायाचे ठिकाण न राहता ग्राहक आणि कर्मचाऱ्यांमध्ये आपलेपणाचे नाते निर्माण करणारे एक आनंददायी ठिकाण बनले आहे.
कर्मचाऱ्यांचा सन्मान, नेतृत्वाची संधी आणि ग्राहकांशी आपुलकीचे नाते—या त्रिसूत्रीमुळे परळच्या ‘ केऔस कॅफे’ची ‘ऑरेंज कॅप’ संकल्पना निश्चितच कौतुकास पात्र ठरत आहे.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
24 SEPT TO 30 SEPT 2026...
- 24 September, 2026
ADHARSH SWARAJ 9 JULY TO...
- 09 July, 2026
ADHARSH SWARAJ 2 JULY TO...
- 02 July, 2026
ADHARSH SWARAJ 25 JUNE...
- 25 June, 2026
ADHARSH SWARAJ 18 JUNE...
- 18 June, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Karishma Sawant