Gen-Z च्या रोजगारासाठी फडणवीस सरकारचा मोठा प्लॅन
Gen-Z च्या रोजगारासाठी फडणवीस सरकारचा मोठा प्लॅन
मुंबई-: जंतर मंतरवर आणि मुंबईसह राज्यात विविध ठिकाणी Gen-Z ने केलेल्या आंदोलनामुळे सरकार आता त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करत आहे. नव्या पिढीच्या मागण्या, विचार जाणून घेण्यासाठी सरकार विविध माध्यमातून काम करत आहे. याचाच एक भाग म्हणजे महाराष्ट्र सरकारने Gen-Z चे रोजगार विषयक प्रश्न सोडवण्यासाठी महत्त्वपूर्ण अभियान हाती घेतले आहे. रोजगाराच्या जास्तीत जास्त संधी उपलब्ध करून देण्यासाठी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या वतीने 31 मार्च 2027 पर्यंत 1 हजार रोजगार मेळाव्यांचे (Job Fairs) आयोजन केले जाणार आहे. या रोजगार मेळाव्यांची व्यापक माहिती गरजू तरुणांपर्यंत पोहोचण्याचे आदेश कौशल्य विकास व उद्योजकता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिले आहेत. मंत्री लोढा यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय रोजगार मेळावा समितीची बैठक ही झाली
आयटीआय व्यतिरिक्त इतर कॉलेजमधील विद्यार्थी, अपस्किलिंगची गरज असणारे तरुण आणि सामाजिक संस्थांशी संपर्क साधून रोजगार मेळाव्याचा विस्तार केला जाणार
राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात व तालुक्यात रोजगार मेळाव्याची माहिती दिली जाईल.
तरुणांना रोजगाराचे महत्त्व आणि स्वयंरोजगाराचे फायदे पटवून देण्यासाठी तज्ज्ञ व्यक्ती व एनजीओंच्या माध्यमातून समुपदेशन केले जाईल.
पहिल्या आठवड्यात पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, एथिकेट्स (शिष्टाचार), बायोडाटा तयार करणे आणि संभाषण कौशल्यांवर भर दिला जाईल
दुसऱ्या आठवड्यामध्ये विद्यार्थ्यांच्या अॅप्टिट्यूड टेस्टनुसार इलेक्ट्रिसिटी, प्लंबिंग, रिसेप्शनिस्ट आणि मार्केटिंग यांसारख्या क्षेत्रांत थेट प्रात्यक्षिक दिले जाईल
केवळ रोजगार मेळावे आयोजित न करता उमेदवारांना पूर्व-प्रशिक्षण देण्याचा सरकारचा मानस आहे
रोजगार मेळाव्यापूर्वी उमेदवारांना दोन आठवड्यांचे कौशल्य व पूर्व-रोजगार प्रशिक्षण देण्याचा प्रयत्न असेल
उमेदवारांना योग्य मार्गदर्शन व प्रशिक्षण मिळाल्यास मेळाव्यांमधील निवडीचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढेल, असा सरकारला विश्वास आहे
या उपक्रमाच्या नियोजनासाठी आणि अंमलबजावणीसाठी संबंधित विभागाचे अधिकारी व प्रदेश समन्वय समिती यांनी एकत्रितपणे काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 9 JULY TO...
- 09 July, 2026
ADHARSH SWARAJ 2 JULY TO...
- 02 July, 2026
ADHARSH SWARAJ 25 JUNE...
- 25 June, 2026
ADHARSH SWARAJ 18 JUNE...
- 18 June, 2026
ADHARSH SWARAJ 4 JUNE TO...
- 04 June, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Karishma Sawant