सप्टेंबरमध्ये CJP करणार देशव्यापी ‘क्या बोलती पब्लिक’ अभियान
सप्टेंबरमध्ये CJP करणार देशव्यापी ‘क्या बोलती पब्लिक’ अभियान
मुंबई- : जंतर मंतरवरील आंदोलनात मोठे यश मिळवल्यावर CJP संस्थापक अभिजीत दीपके याने आता त्यांच्या आगामी आंदोलनाची घोषणा केली आहे. देशभरात सुरू असलेल्या विविध सामाजिक आणि लोकशाही विषयांवरील चर्चेच्या पार्श्वभूमीवर अभिजित दिपके यांनी पत्रकारांशी संवाद साधताना पुढील वाटचालीची दिशा स्पष्ट केली. सरकारवर टीका करताना त्यांनी शिक्षण, बेरोजगारी, न्यायव्यवस्था, माध्यमांची भूमिका आणि लोकशाही मूल्ये यासारख्या अनेक मुद्द्यांवर भूमिका मांडली. सप्टेंबर महिन्यात देशव्यापी जनसंवाद अभियान सुरू करण्याची घोषणाही त्याने केली
या मोहिमेद्वारे देशभरातील नागरिकांशी थेट संवाद साधून त्यांच्या समस्या, अपेक्षा आणि सूचना जाणून घेतल्या जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. युवकांचे शिक्षण, वाढती बेरोजगारी आणि महागड्या शिक्षणामुळे पालकांवर पडणारा आर्थिक भार हे CJPच्या आंदोलनाचे प्रमुख मुद्दे असतील, असे त्यांनी स्पष्ट केले.
‘क्या बोलती पब्लिक’ हे व्यापक आंदोलन आणि मोहीम राबवली जाणार आहे. देशातील सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न आणि समस्या जाणून घेण्यासाठी ही मोहीम हाती घेण्यात येत असल्याची घोषणा ‘सीजेपी’चे अभिजीत दीपके यांनी केली आहे. या मोहिमेत त्यांनी जास्तीत जास्त लोकांनी सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिल.
पत्रकार परिषदेत अभिजीत दीपके यांनी देशातील सध्याच्या गंभीर परिस्थितीवर बोट ठेवले. ते म्हणाले, सध्या देशात शिक्षण व्यवस्था सर्वसामान्यांच्या अवाक्याबाहेर गेली आहे. बेरोजगारीचा प्रश्न इतका भीषण बनला आहे की, ज्यांच्याकडे डिग्री आहेत तेही आज बेरोजगार फिरत आहेत. देशात 60 टक्के जनता ही 35 वर्षांखालील आहे. परंतु, बहुतांश तरुणांकडे नोकऱ्या नाहीत.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 9 JULY TO...
- 09 July, 2026
ADHARSH SWARAJ 2 JULY TO...
- 02 July, 2026
ADHARSH SWARAJ 25 JUNE...
- 25 June, 2026
ADHARSH SWARAJ 18 JUNE...
- 18 June, 2026
ADHARSH SWARAJ 4 JUNE TO...
- 04 June, 2026
आम्हाला फॉलो करा
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
भावपूर्ण श्रद्धांजलि
K. Krishnan
- श्रद्धांजलि
- June 14
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
गुरुदत्त वाकदेकर