पुण्यातून फरार मोस्ट वाँटेड गुन्हेगार महिलेला UAE मधून अटक
पुण्यातून फरार मोस्ट वाँटेड गुन्हेगार महिलेला UAE मधून अटक
पुणे-: पुण्यातून फरार झालेली आर्थिक फसवणुकीचा गुन्हा करणारी मोस्ट वाँटेड महिला गुन्हेगार विशाखा राठोड ही UAE मध्ये पोलिसांच्या तावडीत पासडली असून तिला भारतात परत आणण्यात आले आहे. CBI ने परराष्ट्र मंत्रालय आणि गृह मंत्रालयाच्या सहकार्याने ही मोठी कारवाई केली आहे. विशाखा राठोडवर 88 कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप आहे.
इंटरपोलच्या रेड नोटीसअंतर्गत विशाखा राठोडला फरार घोषीत करण्यात आले होते. 3 ऑगस्टला तिला भारतात आणण्यात आले. पुण्यात दाखल झाल्यावर महाराष्ट्र पोलिसांच्या पथकाने तिला ताब्यात घेतले
विशाखा राठोड ही पुण्यातील एक फरार आरोपी आहे. विशाखा आणि तिचा पती अविनाश अर्जुन राठोड दोघेही पुण्यातील बाणेर परिसरात असलेल्या ‘एपीएस वेल्थ व्हेंचर्स एलएलपी’ नावाच्या कंपनीचे संचालक/व्यवस्थापक आहेत. डिसेंबर 2020 मध्ये या कंपनीची नोंदणी झाली होती.
एप्रिल 2023 मध्ये पुणे पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला. या दांपत्याने निश्चित मासिक परताव्याचे खोटे आश्वासन देऊन गुंतवणूकदारांना विविध योजनांमध्ये गुंतवणूक करण्यास प्रवृत्त केले. अनेकांनी यात गुंतवणूक केली. परंतु परतावा मिळाला नाही आणि गुंतवणुकीची रक्कमही परत मिळाली नाही अशी तक्रार दाखल करण्यात आली.
यापूर्वी, पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने (EOW) आवश्यक आंतरराष्ट्रीय कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून आणि संयुक्त अरब अमिरातीमधून प्रत्यार्पण करून 88 कोटी रुपयांच्या गुंतवणूक घोटाळा प्रकरणाचा सूत्रधार अविनाश अर्जुन राठोड याला अटक केली होती. यानंतर आता विशाखाला अटक करण्यात आली आहे.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 9 JULY TO...
- 09 July, 2026
ADHARSH SWARAJ 2 JULY TO...
- 02 July, 2026
ADHARSH SWARAJ 25 JUNE...
- 25 June, 2026
ADHARSH SWARAJ 18 JUNE...
- 18 June, 2026
ADHARSH SWARAJ 4 JUNE TO...
- 04 June, 2026
आम्हाला फॉलो करा
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
भावपूर्ण श्रद्धांजलि
K. Krishnan
- श्रद्धांजलि
- June 14
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Karishma Sawant