TET पेपर लीक प्रकरणातसर्व 15 आरोपींना न्यायालयीन कोठडी
TET पेपर लीक प्रकरणातसर्व 15 आरोपींना न्यायालयीन कोठडी
ठाणे -: भिवंडीतील गाजलेल्या TET पेपर लीक प्रकरणात आज महत्त्वाची घडामोड घडली. पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर भिवंडी न्यायालयाने या प्रकरणातील सर्व 15 आरोपींना 17 ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडीत पाठविण्याचे आदेश दिले.
आज या प्रकरणातील सर्व 15 आरोपींना भिवंडी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायाधीश एस. एम. घोडके यांच्या न्यायालयात सुनावणी झाली. यापूर्वी पोलिसांनी आरोपींची समोरासमोर बसवून चौकशी केली होती. प्रकरणातील विविध धागेदोरे जोडण्यासाठी संयुक्त चौकशीची आवश्यकता असल्याचे पोलिसांनी न्यायालयासमोर मांडले होते.
याआधी न्यायालयाने पोलिसांची मागणी मान्य करत सर्व आरोपींना 3 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. या कालावधीत तपास यंत्रणांनी आरोपींची सखोल चौकशी करून प्रकरणातील अनेक बाबींचा तपास केला.
सोमवारी पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर सर्व आरोपींना पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने सर्व 15 आरोपींना 17 ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडीत पाठविण्याचे आदेश दिले. दरम्यान, या प्रकरणाचा तपास अद्याप सुरू असून पेपर लीक रॅकेट, आर्थिक व्यवहार आणि इतर संभाव्य आरोपींच्या भूमिकेचा तपास पोलीस करत आहेत.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 9 JULY TO...
- 09 July, 2026
ADHARSH SWARAJ 2 JULY TO...
- 02 July, 2026
ADHARSH SWARAJ 25 JUNE...
- 25 June, 2026
ADHARSH SWARAJ 18 JUNE...
- 18 June, 2026
ADHARSH SWARAJ 4 JUNE TO...
- 04 June, 2026
आम्हाला फॉलो करा
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
भावपूर्ण श्रद्धांजलि
K. Krishnan
- श्रद्धांजलि
- June 14
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Karishma Sawant