ज्येष्ठ पत्रकार लक्ष्मणराव जोशी यांचे दुःखद निधन
ज्येष्ठ पत्रकार लक्ष्मणराव जोशी यांचे दुःखद निधन
मुंबई -: पत्रकारितेतील ज्येष्ठ, अभ्यासू व निस्पृह व्यक्तिमत्त्व म्हणून परिचित असलेले ज्येष्ठ पत्रकार लक्ष्मणराव जोशी यांचे आज दुपारी २ वाजता देवनगर येथील सत्यम हॉस्पिटल येथे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. मृत्युसमयी त्यांचे वय ८९ वर्षे होते.
पत्रकारितेतील आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीत त्यांनी सुरुवातीला ‘तरुण भारत’ या दैनिकात पत्रकार म्हणून कार्य केले. त्यानंतर काही काळ गोव्यात पत्रकारिता केल्यानंतर ते पुन्हा नागपूरला परतले आणि ‘तरुण भारत’ मध्ये कार्यरत राहिले. पुढे त्यांनी ‘लोकशाही वार्ता’ या वृत्तपत्रात संपादक म्हणून उल्लेखनीय कामगिरी बजावत पत्रकारितेतील प्रामाणिकपणा, निर्भीड लेखन आणि सामाजिक बांधिलकीची परंपरा जपली. त्यांच्या लेखणीने अनेक सामाजिक विषयांना प्रभावीपणे वाचा फोडली तसेच नवोदित पत्रकारांना त्यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.
त्यांच्या पश्चात दोन मुली असा परिवार आहे. त्यांच्या कुटुंबाचा सांभाळ व सर्व जबाबदारी त्यांचे जावई प्रकाशराव मुलावकर यांनी सांभाळली. त्यांची अंत्ययात्रा बुधवार, दि. २९ जुलै रोजी सकाळी १०.३० वाजता, सहकार नगर, १७९, कुकुराज अपार्टमेंट येथील निवासस्थानावरून निघणार असून सहकार नगर घाट येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 9 JULY TO...
- 09 July, 2026
ADHARSH SWARAJ 2 JULY TO...
- 02 July, 2026
ADHARSH SWARAJ 25 JUNE...
- 25 June, 2026
ADHARSH SWARAJ 18 JUNE...
- 18 June, 2026
ADHARSH SWARAJ 4 JUNE TO...
- 04 June, 2026
आम्हाला फॉलो करा
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
भावपूर्ण श्रद्धांजलि
K. Krishnan
- श्रद्धांजलि
- June 14
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Karishma Sawant