ताडोबात आधी रस्ता अडवला, खात्री केली अन्… बछडे आले बाहेर
ताडोबात आधी रस्ता अडवला, खात्री केली अन्… बछडे आले बाहेर
चंद्रपूर -:- ताडोबातील प्रसिद्ध वाघीण ‘छोटी मधू’ पुन्हा एकदा चर्चेत आली आहे, तिच्या अद्भुत सतर्कतेमुळे! मोहर्ली मार्गावरून आपल्या बछड्यांना घेऊन जात असताना, छोटी मधू आधी एकटीच रस्त्यावर आली. तिने दोन्ही बाजूंनी येणाऱ्या वाहनांचा अंदाज घेतला, परिसर पूर्णपणे सुरक्षित असल्याची खात्री करून घेतली. आणि जेव्हा तिला खात्री पटली की आता धोका नाही, तेव्हाच तिने झाडीत लपलेल्या आपल्या बछड्यांना बाहेर येण्याचा सिग्नल दिला!
आईची खूण मिळताच हे गोंडस बछडे अतिशय शांतपणे रस्त्याच्या पलीकडे गेले आणि पुन्हा जंगलाच्या सुरक्षित सावलीत शिरले.हा सर्व प्रकार पर्यटकांच्या कॅमेऱ्यात कैद झालेला हा प्रसंग केवळ वन्यजीवप्रेमींसाठीच नव्हे, तर निसर्गातील मातृत्वाचा एक दुर्मीळ दस्तावेज ठरत आहे. बछड्यांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देणाऱ्या ‘छोटी मधू’च्या या सतर्कतेचे आता चौफेर कौतुक होत आहे.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
24 SEPT TO 30 SEPT 2026...
- 24 September, 2026
ADHARSH SWARAJ 9 JULY TO...
- 09 July, 2026
ADHARSH SWARAJ 2 JULY TO...
- 02 July, 2026
ADHARSH SWARAJ 25 JUNE...
- 25 June, 2026
ADHARSH SWARAJ 18 JUNE...
- 18 June, 2026
आम्हाला फॉलो करा
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
सेलिब्रिटी बर्थडे
Navjot singh sidhu
- जन्मदिन
- October 20
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Karishma Sawant