स्वित्झर्लंड मध्ये ठाण्याच्या जलतरण पटूंची ऐतिहासिक कामगिरी
स्वित्झर्लंड मध्ये ठाण्याच्या जलतरण पटूंची ऐतिहासिक कामगिरी
ठाणे -: स्वित्झर्लंडमधील झुरिच लेक येथे झालेल्या ३८व्या श्री चिन्मय स्विम मॅरेथॉन स्पर्धेत ठाण्याच्या तीन युवा जलतरणपटूंनी भारताला प्रथमच रौप्यपदक मिळवून देत इतिहास घडविला. या यशाबद्दल कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार ॲड. निरंजन डावखरे यांच्या हस्ते जलतरणपटू आणि प्रशिक्षकांचा सत्कार करण्यात आला.
ठाणे महानगरपालिकेच्या मारोतराव शिंदे जलतरण तलावात सराव करणाऱ्या आणि ठाणे जिल्हा हौशी जलतरण संघटनेशी संलग्न स्टारफिश स्पोर्ट्स फाउंडेशनच्या आयुषी कैलास आखाडे, समीप्ता गणेश वाव्हळ आणि सुयश प्रियांका हिंदळेकर यांनी २६ किलोमीटरच्या वेटसूट सांघिक प्रकारात अवघ्या ८ तास ७ मिनिटांत अंतर पूर्ण करत भारतीय संघाला ऐतिहासिक रौप्यपदक मिळवून दिले.
रॅपर्सव्हिल ते झुरिच या खुल्या पाण्यातील स्पर्धेत मुसळधार पाऊस, जोरदार वारे आणि १२ ते १३ अंश सेल्सिअस तापमानाच्या थंड पाण्याचा सामना करत या खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी केली. दहा आंतरराष्ट्रीय संघांमध्ये भारतीय संघ हा वयाने सर्वात लहान संघ होता.
सत्कारप्रसंगी आमदार डावखरे यांनी युवा जलतरणपटूंना श्री विठ्ठल-रुक्मिणींची मूर्ती भेट देत शुभेच्छा दिल्या. या खेळाडूंनी भारताचा तिरंगा आंतरराष्ट्रीय स्तरावर अभिमानाने फडकावला असून भविष्यातही ते देशाचे नाव उज्ज्वल करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. प्रशिक्षक कैलास आखाडे यांच्या मार्गदर्शनाचेही त्यांनी विशेष कौतुक केले.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
24 SEPT TO 30 SEPT 2026...
- 24 September, 2026
ADHARSH SWARAJ 9 JULY TO...
- 09 July, 2026
ADHARSH SWARAJ 2 JULY TO...
- 02 July, 2026
ADHARSH SWARAJ 25 JUNE...
- 25 June, 2026
ADHARSH SWARAJ 18 JUNE...
- 18 June, 2026
आम्हाला फॉलो करा
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
सेलिब्रिटी बर्थडे
Navjot singh sidhu
- जन्मदिन
- October 20
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Karishma Sawant