विद्यार्थ्यांसाठी 26 जुलैला ठाकरे बंधुंचा संयुक्त मोर्चा
विद्यार्थ्यांसाठी 26 जुलैला ठाकरे बंधुंचा संयुक्त मोर्चा
मुंबई-: दिल्लीत सुरू असलेल्या CJP च्या आंदोलनात विद्यार्थ्यांवर करण्यात आलेल्या पोलीस कारवाईचे पडसाद आता मुंबईसह राज्यभर उमटत आहेत. काल रात्री उद्धव ठाकरे यांनी जंतरमंतर वर जाऊन CJP संस्थापक अभिजीत दीपकेची भेट घेऊन त्याच्याशी चर्चा केली. आज मुंबईतही आंदोलन करण्यात आले. मुंबईतील CJP सदस्यांनी आज सायंकाळी राज ठाकरे यांची भेट घेतली. त्यानंतर संघटनात्मक कारवाईला वेग आला असून २६ जुलैला मुंबईत ठाकरे बंधु विद्यार्थ्यांसाठी संयुक्त मोर्चाचे आयोजन केले आहे. तत्पूर्वी राज ठाकरेंची उद्या सकाळी पत्रकार परिषद होणार आहे. यात या संयुक्त मोर्चाबाबत माहिती दिली जाणार आहे.
दरम्यान आदित्य ठाकरे यांनी आंदोलक विद्यार्थ्यांना संबोधित करताना शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. तसेच या विद्यार्थ्यांना 24 जुलै रोजी असणाऱ्या तिरंगा रॅलीत सहभागी होण्याचेही आवाहन केले आहे. आदित्य ठाकरे यांनी पुढे बोलताना म्हटले की, ‘मी तुम्हा सर्वांना विनंती करत आहे की, पाऊस वाढणार आहे, दिवस मावळणार आहे, पण आपल्याला शांत बसायचं नाही. रक्त हे सळसळतं ठेवायचं आहे. उद्धव साहेब आणि राजसाहेब इतर पक्षांसोबत बोलत आहेत. आपण मुंबईत मोर्चा काढणार आहोत, धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा ही आपली मागणी आहे. मी सर्वांना आवाहन करतो की, 24 तारखेला पुन्हा इथे जमायचं आहे. इथे येऊन आपल्याला राष्ट्रगीत गायचं आहे.’
आदित्य ठाकरे यांनी म्हटले की, तुम्ही सगळे एकत्र आला आहात हे फार महत्त्वाचं आहे. कोणतेही राजकीय आवाहन न करता ही गर्दी झाली आहे, त्यामुळे मी तुमचं अभिनंदन करतो, असंच दिल्लीला हलवू शकतो आपण. आपण दोन लोकांसाठी एकत्र आलो आहोत, सोनम वांगचुक आणि अभिजीत दिपके. सुरुवातीला सरकार चर्चेसाठी आपल्याकडे आलं असतं, पण ते न करता लाठीचार्ज करण्यात आला. आपण दुपारपासून इथे आला आहात, खरोखर मी तुमच्या ताकदीला सलाम करतो. ही देशाची युवा शक्ती आहे, महाराष्ट्राची युवा शक्ती आहे.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 9 JULY TO...
- 09 July, 2026
ADHARSH SWARAJ 2 JULY TO...
- 02 July, 2026
ADHARSH SWARAJ 25 JUNE...
- 25 June, 2026
ADHARSH SWARAJ 18 JUNE...
- 18 June, 2026
ADHARSH SWARAJ 4 JUNE TO...
- 04 June, 2026
आम्हाला फॉलो करा
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
भावपूर्ण श्रद्धांजलि
K. Krishnan
- श्रद्धांजलि
- June 14
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
गुरुदत्त वाकदेकर