या जिल्हा बॅंकेला RBI कडून १३ लाखांचा दंड
या जिल्हा बॅंकेला RBI कडून १३ लाखांचा दंड
मुंबई-: RBI नं जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार राज्यातील दोन बँकांना आर्थिक दंड करण्यात आला आहे. कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, मनमाड अर्बन को ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, मनमाड या दोन बँकांना आर्थिक दंड करण्यात आला आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं 17 जुलै रोजी जारी केलेल्या आदेशानुसार कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेला 13.30 लाख रुपयांचा दंड करण्यात आला आहे. बँकिंग नियमन कायदा 1949 च्या सेक्शन 20(1) आणि सेक्शन 56 संदर्भातील तरतुदींची पूर्तता न केल्यानं ही कारवाई करण्यात आली आहे,असं RBI ने म्हटलं. बँकिंग नियमन कायद्यानुसार मिळालेल्या अधिकारांचा वापर करत ही आर्थिक दंडात्मक कारवाई केल्याचं आरबीआयनं म्हटलं आहे.
नाबार्डकडून 31 मार्च 2025 च्या कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आर्थिक स्थितीचं इन्सपेक्शन करण्यात आलं होतं. त्यावेळी काही नियमांची पूर्तता न केल्याचं निदर्शनास आलं होतं. त्यानंतर बँकेला नोटीस देत आर्थिक दंड का करु नये असं विचारण्यात आलं होतं. कोल्हापूर जिल्हा बँकेच्या उत्तरानंतर आरबीआयनं दंडात्मक कारवाई केली आहे. कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेनं संचालकांशी संबंधित कर्ज मंजूर केल्याचं निरीक्षण आरबीआयनं नोंदवलं असून दंडात्मक कारवाई केली आहे.
त्याचबरोबर RBI ने मनमाड अर्बन को ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड मनमाडला 1 लाख रुपयांचा दंड केलेला आहे. या बँकेनं बँकिंग नियमन कायद्यानुसार संचालकांना, त्यांच्या नातेवाईकांना कर्ज देण्यासंदर्भातील नियमांची पूर्तता न केल्यानं दंड करण्यात आला आहे. या बँकेनं संचालकांच्या नातेवाईकांना कर्ज मंजूर केल्याचं निदर्शनास आल्यानं ही कारवाई करण्यात आली आहे.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
24 SEPT TO 30 SEPT 2026...
- 24 September, 2026
ADHARSH SWARAJ 9 JULY TO...
- 09 July, 2026
ADHARSH SWARAJ 2 JULY TO...
- 02 July, 2026
ADHARSH SWARAJ 25 JUNE...
- 25 June, 2026
ADHARSH SWARAJ 18 JUNE...
- 18 June, 2026
आम्हाला फॉलो करा
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
सेलिब्रिटी बर्थडे
Navjot singh sidhu
- जन्मदिन
- October 20
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Karishma Sawant