कोकण रेल्वेमध्ये थेट मुलाखतीद्वारे नोकरीची संधी
कोकण रेल्वेमध्ये थेट मुलाखतीद्वारे नोकरीची संधी
मुंबई-: कोकण रेल्वेमध्ये विविध पदांसाठी भरती सुरू आहे. ‘कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड’ तांत्रिक क्षेत्रातील अनुभवी उमेदवारांसाठी नोकरीची मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे. कोकण रेल्वेच्या ‘रोलिंग स्टॉक कंपोनंट फॅक्टरी, लोटे’ (ता. चिपळूण, जि. रत्नागिरी) या प्रकल्पासाठी विविध ११ तांत्रिक आणि सुरक्षा संवर्गातील एकूण ४० पदांसाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे. या पदांसाठी उत्तम मानधन देण्यात येणार आहे.
विशेष म्हणजे, या पदांसाठी कोणतीही लेखी परीक्षा घेतली जाणार नसून, केवळ थेट ‘वॉक-इन इंटरव्ह्यू’ (थेट मुलाखत) याद्वारे उमेदवारांची निवड केली जाणार आहे. ही भरती सुरुवातीला एक वर्षाच्या निश्चित कालावधीसाठी कंत्राटी तत्त्वावर असेल, जी कामगिरी आणि गरजेनुसार पुढे वाढवली जाऊ शकते.
पदांचे तपशिल
कोकण रेल्वेने प्रसिद्ध केलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार एकूण ४० पदांमध्ये खालीलप्रमाणे वर्गीकरण करण्यात आले आहे:
सीएनसी मशीन ऑपरेटर: १० जागा
टेक्निशियन (फिटर): ०८ जागा
फिटर – मेकॅट्रॉनिक्स मेंटेनन्स: ०६ जागा
ईओटी / फोर्क लिफ्ट / टग ऑपरेटर: ०५ जागा
ज्युनिअर टेक्निकल असिस्टंट (मॅन्युफॅक्चरिंग अँड मेंटेनन्स): ०२ जागा
सिनियर टेक्निकल असिस्टंट (मेंटेनन्स): ०२ जागा
नॉन-डिस्ट्रक्टिव टेस्टिंग टेक्निशियन: ०२ जागा
टेक्निशियन (वेल्डर): ०२ जागा
ज्युनिअर टेक्निकल असिस्टंट (सिव्हिल): ०१ जागा
सिनियर टेक्निकल असिस्टंट (सिव्हिल): ०१ जागा
सुरक्षा अधिकारी (सेफ्टी ऑफिसर): ०१ जागा
एकूण ४० जागांपैकी ३१ जागा खुल्या (UR), १ जागा ईडब्ल्यूएस (EWS), ६ जागा ओबीसी (OBC) आणि २ जागा अनुसूचित जाती (SC) प्रवर्गासाठी राखीव आहेत.
उमेदवारांना अधिक सविस्तर माहिती आणि अर्जाचा नमुना कोकण रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळावर https://konkanrailway.com/ (Recruitment > Current Notifications) या लिंकवर उपलब्ध आहे. तांत्रिक क्षेत्रात रेल्वेसोबत काम करण्याची इच्छा असलेल्या तरुणांनी या संधीचा नक्की लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 9 JULY TO...
- 09 July, 2026
ADHARSH SWARAJ 2 JULY TO...
- 02 July, 2026
ADHARSH SWARAJ 25 JUNE...
- 25 June, 2026
ADHARSH SWARAJ 18 JUNE...
- 18 June, 2026
ADHARSH SWARAJ 4 JUNE TO...
- 04 June, 2026
आम्हाला फॉलो करा
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
भावपूर्ण श्रद्धांजलि
K. Krishnan
- श्रद्धांजलि
- June 14
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
गुरुदत्त वाकदेकर