‘राम मंदिरात चुकीच्या घटना घडत असतील तर भारत विश्वगुरू कसा होणार?
‘राम मंदिरात चुकीच्या घटना घडत असतील तर भारत विश्वगुरू कसा होणार?
मुंबई-: ज्येष्ठ पार्श्वगायिका अनुराधा पौडवाल यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत देशातील सध्याच्या परिस्थितीवर भाष्य करत ‘विश्वगुरू भारत’ या संकल्पनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. राम मंदिरातील देणगीच्या कथित गैरव्यवहाराचा उल्लेख करत अशा घटना घडत असतील तर भारत विश्वगुरू कसा होणार, असा सवाल त्यांनी केला. याच मुलाखतीत त्यांनी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील काही वेदनादायी आठवणींनाही उजाळा दिला.
पत्रकार शुभंकर मिश्रा यांना दिलेल्या मुलाखतीत अनुराधा पौडवाल म्हणाल्या, “काही वर्षांपूर्वी माझ्याही मनात भारत विश्वगुरू बनेल, अशी आशा होती. मात्र आता जे चित्र दिसत आहे, ते त्या संकल्पनेला पूरक वाटत नाही. शिक्षणाचा प्रसार करण्याची भाषा केली जाते, पण हजारो शाळा बंद झाल्याच्या बातम्या समोर येत आहेत. २०४७ पर्यंत भारत विश्वगुरू होईल, असा दावा केला जातो; मात्र त्यासाठी आवश्यक वातावरण निर्माण होत आहे का, याचा विचार करण्याची गरज आहे.”
राम मंदिरातील देणगीच्या कथित गैरव्यवहाराचा संदर्भ देत त्या म्हणाल्या, “राम मंदिराच्या देणगीतही लूट झाल्याच्या गोष्टी समोर येत आहेत. अशा घटना घडत असतील तर भारत विश्वगुरू कसा होणार?” असेही त्यांनी नमूद केले.
याच मुलाखतीत अनुराधा पौडवाल यांनी त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलही प्रथमच सविस्तर भाष्य केले. त्यांच्या पहिल्या मुलीचे जन्मानंतर अवघ्या २५ दिवसांत निधन झाले होते. या घटनेमुळे आपण पूर्णपणे खचून गेलो होतो, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. तसेच १२ सप्टेंबर २०२० रोजी मूत्रपिंड निकामी झाल्याने त्यांच्या मुलाचे निधन झाल्याची आठवणही त्यांनी सांगितली.
हिंदीसह विविध भारतीय भाषांतील गायनामुळे अनुराधा पौडवाल यांनी स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. त्यांना राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, चार फिल्मफेअर पुरस्कार, सहा महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार आणि इतर अनेक सन्मान मिळाले आहेत. कला क्षेत्रातील योगदानाबद्दल भारत सरकारने त्यांना ‘पद्मश्री’ पुरस्काराने गौरविले आहे.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 9 JULY TO...
- 09 July, 2026
ADHARSH SWARAJ 2 JULY TO...
- 02 July, 2026
ADHARSH SWARAJ 25 JUNE...
- 25 June, 2026
ADHARSH SWARAJ 18 JUNE...
- 18 June, 2026
ADHARSH SWARAJ 4 JUNE TO...
- 04 June, 2026
आम्हाला फॉलो करा
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
भावपूर्ण श्रद्धांजलि
K. Krishnan
- श्रद्धांजलि
- June 14
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Karishma Sawant