इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या सुट्या भागांवरील सीमा शुल्क माफ
इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या सुट्या भागांवरील सीमा शुल्क माफ
मुंंबई-: Make in India ला गती देण्यासाठी आणि भारताला इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनाचे जागतिक केंद्र बनवण्यासाठी केंद्र सरकारने स्मार्टफोन, लॅपटॉप, स्मार्ट टीव्ही आणि वेअरेबल्सच्या सुट्या भागांवर, तसेच लिथियम-आयन सेल्स उत्पादनाच्या यंत्रसामग्रीवरील मूलभूत सीमा शुल्क पूर्णपणे माफ केले आहे. अर्थ मंत्रालयाची ही ऐतिहासिक सवलत ३१ मार्च २०२९ पर्यंत लागू राहणार आहे. यामुळे परदेशी आयातीवरील अवलंबित्व कमी होणार आहे.
स्मार्टफोन, लॅपटॉप, स्मार्ट टीव्ही निर्मितीसाठी लागणाऱ्या तीन प्रमुख घटकांवरील मूलभूत सीमा शुल्क प्रशासनाने पूर्णपणे रद्द केले आहे. सरकारच्या या धोरणात्मक निर्णयामुळे आगामी काळात ग्राहकांना इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी करताना मोठा आर्थिक दिलासा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
केंद्रीय अर्थ मंत्रालयाने जारी केलेल्या नवीन मार्गदर्शक तत्त्वांनुसार, प्रामुख्याने लिथियम-आयन बॅटरी सेल्सच्या उत्पादनात वापरल्या जाणाऱ्या अत्याधुनिक यंत्रसामग्रीला करातून पूर्ण सूट देण्यात आली आहे. यामध्ये पावडर ड्रायर्स, स्वयंचलित फीडिंग आणि ब्लेंडिंग सिस्टीम, स्लरी ट्रान्सफर सिस्टीम, कॅथोड-ॲनोड कोटिंग मशीन, हाय-व्हॅक्यूम पंप आणि ऑटो-पॅकिंग यंत्रणा यांसारख्या अनेक प्रगत उपकरणांचा समावेश आहे. याशिवाय, डिस्प्ले असेंब्ली आणि इंडक्टर कॉइल मॉड्यूल्सच्या उत्पादनासाठी आवश्यक असणाऱ्या कच्च्या मालावरही आता कोणताही आयात कर आकारला जाणार नाही.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 9 JULY TO...
- 09 July, 2026
ADHARSH SWARAJ 2 JULY TO...
- 02 July, 2026
ADHARSH SWARAJ 25 JUNE...
- 25 June, 2026
ADHARSH SWARAJ 18 JUNE...
- 18 June, 2026
ADHARSH SWARAJ 4 JUNE TO...
- 04 June, 2026
आम्हाला फॉलो करा
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
भावपूर्ण श्रद्धांजलि
K. Krishnan
- श्रद्धांजलि
- June 14
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
गुरुदत्त वाकदेकर