सरकारने पूर्णपणे थांबवली स्टेनोग्राफर पदाची भरती
सरकारने पूर्णपणे थांबवली स्टेनोग्राफर पदाची भरती
मुंबई-: सरकार महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) माध्यमातून लघुलेखक अर्थात स्टेनोग्राफर पदाची भरती करते. पण आता सरकारने हे पद मृत घोषित करून त्यावरील भरती प्रक्रिया थांबवली आहे. यामुळे हजारो तरुणांचे स्टेनोग्राफर होण्याचे स्वप्न भंगले आहे. त्यामुळे विद्यार्थी वर्गात कमालीचा रोष पसरला आहे. एकीकडे सरकार पदभरती करत नाही आणि दुसरीकडे अशा पद्धतीने आहे ती पदे रद्द करण्याचा निर्णय घेते, असा आरोप विद्यार्थ्यांनी या प्रकरणी केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही या प्रकरणी संताप व्यक्त केला आहे. सरकारने तरुणांच्या नोकऱ्यांची संधी अशा पद्धतीने हिरावून घेऊ नये, असे त्यांनी म्हटले आहे.
सरकारने स्टेनोग्राफर हे पद मृत घोषित करू नये. कारण विद्यार्थी मागील 5 वर्षांपासून या पदाच्या परीक्षेची तयारी करत आहेत. आता सरकारने अचानक हे पद रद्द केल्याने त्यांचे भवितव्य संकटात सापडले आहे. त्यामुळे सरकारने हे पद मृत घोषित न करता त्यावर भरती प्रक्रिया सुरू करावी, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. सरकारच्या निर्णयामुळे स्टेनोग्राफरचे प्रशिक्षण घेतलेल्या लाखो उमेदवारांचे भविष्य अंधारात बुडण्याची भीती आहे. सरकारने आपला निर्णय मागे घेतला नाही, तर पुढच्या काळात रस्त्यावर उतरून आंदोलन केले जाईल, असा इशाराही विद्यार्थ्यांनी सरकारला दिला आहे.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 2 APR TO...
- 02 April, 2026
ADHARSH SWARAJ 26 MAR TO...
- 26 March, 2026
ADHARSH SWARAJ 19 MAR TO...
- 19 March, 2026
ADHARSH SWARAJ 12 MAR TO...
- 12 March, 2026
ADHARSH SWARAJ 5 FEB TO...
- 05 February, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Karishma Sawant